Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

HomeपुणेBreaking News

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

कारभारी वृत्तसेवा Nov 08, 2023 2:32 PM

Abhay Yojana to uplift the industry and trade sector : उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अभय योजना
PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या घेण्याची आवश्यकता!
Ajit Pawar | Guardian Minister | अजित पवार पुण्याचे पालकमंत्री | राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

| आजारपणामुळे प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याचे सांगत  पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family |   “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर रहावे लागणे हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्ताने भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने आणखी काही दिवस जनतेला भेटता येणार नसल्याचे सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

– बारामतीतून शुभेच्छा देण्याची पवार कुटुंबाची परंपरा

दिवाळी पाडवा म्हटलं कि पवार कुटुंब आणि बारामती हमखास आठवते. कारण पाडव्या दिवशी पवार कुटुंबीय  बारामतीतून नागरिकांना शुभेच्छा देत असतात. महाराष्ट्र भरातून लोक पवार कुटुंबाना भेटायला जातात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे तसेच पूर्ण परिवार एकत्र येऊन शुभेच्छा देत असतात. मात्र यंदाचा पाडवा वेगळा आहे. कारण अजित पवार हे परिवार आणि पक्ष सोडून भाजपच्या सत्तेत सामील झाले आहेत. शिवाय राष्ट्रवादी पक्ष कुणाच्या मालकीचा यावरून देखील पवार काका पुतण्यामध्ये वाद सुरु आहेत. त्यामुळे यंदा बारामतीतून शरद पवार यांनी पाडव्याला नागरिकांना शुभेच्छा दिल्या तरी अजित पवार हे त्यांच्यासोबत नसणार आहेत. यामुळे नागरिक आणि कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज आहेत.