Sharad Pawar in Congress Bhavan | दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार

HomeBreaking Newsपुणे

Sharad Pawar in Congress Bhavan | दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार

Ganesh Kumar Mule Dec 28, 2022 3:59 PM

Nana patole Vs PM Modi | कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!” |  नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
Chandrayaan 3 Landing | भारत जगातील पाचवा शक्तिशाली देश | मोहन जोशी
Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा | मोहन जोशी यांची मागणी

दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार

तब्बल दोन दशकानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज पुण्याच्या काँग्रेस भवनात (Congress Bhavan pune) पाऊल ठेवलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (INC)  १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. काँग्रेस भवनात दाखल होतात काँग्रेस नेत्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना केली होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान (
Loksabha Election) पवारांनी पुण्यातील काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली होती.

भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत या नाऱ्यावर आणि काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात त्यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, “काही लोक कॉंग्रेसमुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही प्रमाणात आहेत. पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावं लागणार आहे. सत्ताधारी पक्ष हा देशामध्ये विद्वेष निर्माण करत आहे. आत्ताचं सरकार काँग्रेसविरोधी विद्वेशाची भावना कशी निर्माण होईल यातच धन्यता मानत आहे. पण काँग्रेसी विचार सोडता येणार नाहीत. काँग्रेस पक्षाला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला वर्धापनदिनानिमित्त काँग्रेस भावनात येण्याचं आमंत्रण दिलं”

संयुक्त महाराष्ट्र होण्यात पुण्याच्या काँग्रेस भवनाचं महत्वाचं योगदान

मी पहिल्यांदा सन 1958 मध्ये कॉंग्रेस भवनमधे आलो होतो. आज अनेक वर्षांनी पुन्हा आलोय. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असं त्यावेळी समीकरण होतं. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचं केंद्र इथेच होतं. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूतून चालायचा. इथून कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हेअन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यामध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचं योगदान मोठं आहे, अशी आठवणही यावेळी शरद पवार यांनी सांगितली.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने स्नेह मेळावा ” चहापान ” कार्यक्रम काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आले. या प्रसंगी अनेक प्रतिष्ठित मान्यवर या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.विविध पक्षातील नेते उपस्थित राहून अनेक जुन्या आठवनींना उजाळा देत स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला. शरद पवार  यांनी काँग्रेस भवन येथे ऐतिहासिक व भारत जोडो यात्रेतीक छायाचित्र प्रदर्शन ची पाहणी केली.अरविंद शिंदे ( पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ) यांनी गाई वासरू देऊन पवार साहेबांचे सत्कार केले. या प्रसंगी शाहू महाराज छत्रपती, श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, बाबा आढाव व अनेक नामवंत मंडळी यांनी काँग्रेस भवन ला भेट दिली.