Baner-Balewadi Water issue | अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश 

HomeBreaking Newsपुणे

Baner-Balewadi Water issue | अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश 

Ganesh Kumar Mule Jan 21, 2023 9:30 AM

Amol Balwadkar : अवघ्या १२ तासांत २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सुस गावातील लोकांना दिलासा 
Amol Balwadkar | अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”ला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद
Yoga Day 2023 | राज्य शासन व अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश

पुणे | बाणेर-बालेवाडी (Baner-Balewadi) भागात पाण्याची समस्या (Water issue) मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या भागात  २४x७ समान पाणी पुरवठा योजनेची कामे प्रलंबित आहेत. यावरून महापालिकेच्या कारभाराची तक्रार माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Ex corporator Amol Balwadkar) यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian minister Chandrakat patil) यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत पालमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC pune)
अमोल बालवडकर यांच्या पत्रानुसार  बाणेर-बालेवाडी- -पाषाण भागामध्ये २
७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाण भागातील ८ पैकी ६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्या देखील सुरु करण्यात येतील. परंतु या टाक्यांना ट्रान्समिशन लाईन मधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्या लाईनचे काम आपण केलेल्या सूचनेनुसार पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे. वारजे ते बाणेर-बालेवाडी पर्यंतच्या भागामध्ये या ट्रान्स्मिशन लाईनचे काम अनेक ठिका अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तसेच या टाक्यांच्या अंतिम टप्प्यामधील काही कामे देखील प्रलंबित आहेत. या कामांबाबत आपण स्वतः लक्ष घालून योग्य ती कारवाई केल्यास लवकरच या २४ x ७ समान पाणी पुरव योजनेची सुरुवात बाणेर-बालेवाडी भागामध्ये होईल. असे बालवडकर यांनी पालकमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले होते.
 बालेवाडी व बाणेर येथील टाक्यांना पाणी पुरवठा करण्याकरिता जोडण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामामध्ये काही जागा मालकांच्या परवानग्या प्रलंबित आहेत. परवानग्या मिळविण्याकरिता पुणे म.न.पा.च्या अधिकार्यांना कृपया आपण योग्य त्या सूचना करून तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. या सर्व प्रलंबित कामांमुळे २४ x ७ समान पाणी पुरवठा योजना या प्रकल्पास विलंब होत आहे. बाणेर-बालेवाडीचा गंभीर पाणी प्रश्न आपल्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात काही प्रमाणात यश आले आहे. तरी पुढील काळात अशी पाणी टंचाई भासू नये या करिता हा प्रकल्प या भागामध्ये लवकरात लवकर सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. जर हि सर्व कामे लवकर पूर्ण झाली तर येत्या उन्हाळ्याच्या सुरवातीला एप्रिल – मे पर्यंत या प्रकल्पाचे उद्घाटन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल.
तरी सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याकरिता आपण संबंधित खात्यांच्या अधिकार्यांना तातडीने उपाय योजना करण्यास सांगावे. पालकमंत्र्यांनी बालवडकर यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्तांना आदेश देत प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सांगितले आहे.
| ही आहेत प्रलंबित कामे 
१. डुक्कर खिंड वारजे – NHAI च्या उर्वरित परवानगी करिता २५० मी. चे काम प्रलंबित आहे.
२. वारजे येथे दिलीप बराजे यांच्या परवानगी अभावी ३६ मी.ची लाईन प्रलंबित.
३. चांदणी चौक – श्री.अजमेर यांच्या जागेमधून जाणार्या ६० मी च्या लींचे काम प्रलंबित.
४. HEMRL येथील रामनदी वरील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे पुढे ट्रान्स्मिशन लाईन चे काम अपूर्ण.
५. पाषाण तलाव नजीकच्या शिव मंदिर येथील STRUCTURAL STEEL BRIDGE च्या प्रलंबित कामामुळे ४० मी लाईनचे काम प्रलंबित.
६. सुस खिंड ते कुमार पेपीलोन सोसायटी पर्यंतचे सुमारे ८०० मी चे काम पाईप उपलब्ध नसल्याने प्रलंबित
७. सुतारवाडी गावठाण येथे सुमारे १५० मी चे काम अरुंद रस्त्यामुळे प्रलंबित.
८. सुस खिंड पूल ते किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) पर्यंत एकूण १२७५ मी. लांबी पैकी ८७४ मी. लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.
९. किया शोरूम (बीटवाईज चौक बाणेर) ते बालेवाडी डेपो पर्यंतच्या एकूण २१५० मी. पैकी १२३० मी लांब पाईप लाईन टाकण्याचे काम प्रलंबित.