Aditya Thackeray visited Vetal Tekadi | वेताळ टेकडीचा बळी देण्याचा पुणे महापालिकेचा घाट    | आदित्य ठाकरे यांचा आरोप 

HomeBreaking Newsपुणे

Aditya Thackeray visited Vetal Tekadi | वेताळ टेकडीचा बळी देण्याचा पुणे महापालिकेचा घाट  | आदित्य ठाकरे यांचा आरोप 

Ganesh Kumar Mule May 06, 2023 12:27 PM

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे घेणार शिवसेना नेत्यांची बैठक  : पुणे महापालिका निवडणुकीची तयारी 
Aditya Thackeray visited Vetal Tekadi |  PMC pune has laid the foundation to destroy Vetal Hill  |  Aditya Thackeray’s allegation
Aditya Thackeray | शहराच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून मनपा आयुक्तांना उपयुक्त सूचना | आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद

Aditya Thackeray visited Vetal Tekadi | वेताळ टेकडीचा बळी देण्याचा पुणे महापालिकेचा घाट

| आदित्य ठाकरे यांचा आरोप

Aditya Thackeray visited Vetal Tekadi | पुण्यातील ‘मिनी सह्याद्री’ म्हणून ओळख असलेल्या वेताळ टेकडीस (Vetal Tekadi) आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भेट दिली.   विकासाच्या नावाखाली जैवविविधतेने संपन्न असलेल्या या टेकडीचाही बळी देण्याचा घाट पुणे महानगरपालिकेने (pune Municipal Corporation) घातला आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. येथील स्थानिकांचा तसेच पर्यावरणस्नेही संस्थांचा याला विरोध असून या प्रकरणी लक्ष घालून टेकडी वाचवण्यासाठी नक्कीच  प्रयत्न करू, याबद्दल ठाकरे यांनी आश्वासित केले. Aditya Thackeray visited Vetal Tekadi
नदी सुधार प्रकल्पात नागरिकांची दिशाभूल – ठाकरे 
ठाकरे म्हणाले, वेताळ टेकडी असो किंवा नदीकाठ सुधार योजना (River front Devlopment project) यामुळे बेताल विकास सुरू आहे. शाश्वत विकास करणे आवश्यक आहे. अर्बनायझेशन वाढले म्हणजे कसेही रस्ते काढणे नव्हे, मोबॅलिटी प्लान करून योग्य तो निर्णय घ्यायला हवा, जगभरात अर्बनायझेशन झालेल्या शहरात उद्याने, पार्क आहेत, तसे आपल्याकडे व्हायला हवे.  मी पुण्यात होत असलेल्या वेताळ टेकडीवरील आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी माहिती घेतली. सध्या जनतेच्या विरोधात हुकुमशाही सुरू आहे. कोणी सत्य बोललं की त्याला अॅक्टिव्हिस्ट बोलून टीका केली जाते. खरंतर नदीकाठ सुधार जो प्रकल्प सुरू आहे, त्याबाबत माहिती घ्यायला हवे की सर्व नद्या सारख्या नसतात. अगोदर नदीची स्वच्छता करायला हवी, मग सुशोभीकरणाचे पहायला हवे. बाहेरील सल्लागार शहराविषयी काहीही सल्ला देतात आणि वाट लावतात, स्थानिक लोकांना याविषयी समजून घ्यायला हवे. त्यांना तिथली अधिक माहिती असते. माहिती अधिकारात आलेल्या माहितीमध्ये आणि राजकीय नेते यांच्यातील माहितीत तफावत आहे. प्रकल्पाची परवानगी घेताना झाडं कापणार नाही, असे सांगितले होते. पण नंतर सात हजार झाडं कापली जाणार असे सांगितले गेले. ही दिशाभूल केली जात आहे. (PMC Pune)