PMC Ward No 2 | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ‘अँक्शन मोडवर’ | प्रभाग दोन मध्ये पाहणी दौरा ; विकासकामांचा घेतला आढावा

HomeBreaking Newsपुणे

PMC Ward No 2 | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ‘अँक्शन मोडवर’ | प्रभाग दोन मध्ये पाहणी दौरा ; विकासकामांचा घेतला आढावा

कारभारी वृत्तसेवा Dec 05, 2023 1:53 PM

Uruli Devachi and Fursungi | उरुळी देवाची आणि फुरसुंगी महापालिकेतच राहू द्या | महापालिका राज्य सरकारला देणार आपला अभिप्राय
Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!   | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 
PMC Solid Waste Management Department | गणेश विसर्जन मिरवणुकी नंतर केलेल्या स्वच्छता अभियानात  ६७ टन कचरा व ३.५ टन चपला बूट केले गोळा! 

PMC Ward no 2 | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ‘अँक्शन मोडवर’ | प्रभाग दोन मध्ये पाहणी दौरा ; विकासकामांचा घेतला आढावा

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार

 

Vikas Dhakane | Dr Siddharth Dhende | चुकीच्या पद्धतीने होणारे फुटपाथवरील अतिक्रमण हटविणे, दुरुस्ती करणे, अनधिकृत फ्लेक्स काढणे, एअरपोर्ट रस्त्यावर सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे आदीवर त्वरीत कार्यवाही करून विकासकामांना निधी देण्यासाठी महापालिका स्तरावर कार्यवाही करू, असे आश्वासन पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड मध्ये विविध विकासकामांचा, समस्यांचा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आढावा घेतला. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ढाकणे यांनी हे आश्वासन दिले. या वेळी ढाकणे यांनी रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात महापालिका उपायुक्त किशोरी शिंदे, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, आरोग्य निरीक्षक कुटळ आदीसह अधिकारी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. धेंडे यांनी नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली. या मध्ये प्रभागात पाण्याच्या पाइपलाइन आणि ड्रेनेज लाईन जवळून जात असल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणले. त्याबाबत योग्य खबरदारी घेण्याचे सुचविले. नागपूर चाळ येथील मंडईचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्याचा वापर व्यापाऱ्यांना होताना दिसत नसल्याचे निदर्शनास आणले. परिणामी या गाळ्यांचा गैरवापर होत आहे असे सांगितले. तसेच याच्या शेजारी असलेल्या धोकादायक ट्रानसफॉर्मर स्थलांतरित करण्याची मागणी केली.

हाउसिंग बोर्ड मधील घरांचा पुनर्विकास होणार आहे. सद्या या भागात पिण्याच्या पाण्याचे मीटर मीटर बसविण्याचे काम थांबवा अशी विनंती केली. अर्बन 95 अंतर्गत सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. प्रभागातील फुटपाथाची दुरवस्था दाखवली. बायोगॅस कचरा संकलित केल्यानंतर बायोगॅस प्रकल्पामध्ये विल्हेवाट लावली जाते. त्या प्रकल्पाचे कामकाज दाखवले. एअरपोर्ट रस्त्यावरील वाहतुकीच्या नियोजनासाठी बदामी चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली. हा सिग्नल येरवडा चौका सिग्नलशी सुसंगत केल्यास संभाव्य वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असे सुचविले. तसेच गोल्फ क्लब उड्डाणपुलावरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूला वाहने वळविण्यासाठी दुभाजक बसविण्याची मागणी केली. त्यामुळे जीएसटी कार्यालय, आयकर भवन, आयटी पार्कसाठी जाणाऱ्यांची गैरसोय दूर होईल. या बरोबरच कॉमरझोन ते अग्रेसन हायस्कूलच्या रस्त्याचे काम दाखविण्यात आले. काॅमरझोन ते मेंटल चौक पावसाळी लाईन टाकणे , सम्राट अशोक चौक ते मेंटल चौक रस्ता करणे, चंद्रमानगर येथील बीएसयु पीची घरे लवकर करणे. या कामासह प्रभागात सीसीटीव्ही देखभाल दुरुस्ती करणे विविध ठिकाणी पाहणी केली. रखडलेल्या कामासाठी महापालिकेने निधी द्यावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.

या वेळी अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सर्व परिस्थिती पाहून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रभागातील विकासकामांसाठी योग्य निधीबाबत तरतूद करण्याची ग्वाही दिली.

————

पुणे महापालिकेत प्रशासक कार्यरत आहेत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे विविध समस्यांचा प्रभागातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. या वर उपाय काढण्यासाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. या मध्ये प्रभागातील समस्या दाखविल्या. निधी देण्याची मागणी केली. अतिरिक्त आयुक्तांनी देखील या बाबत सकारात्मक भूमिका घेत कार्यवाही करू असे सांगितले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.