अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत होर्डिंग वर कारवाई
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत गंभीर पाऊल उचलले आहे. 31 मे पर्यंत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. काल अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
पुणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किआँक्स यांचेवर गेल्या दोन दिवसांत परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत १५ क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी निष्कासन कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये ५ क्रेन, ४० बिगारी सेवक, ०६ गँस कटर, ५ वेल्डर, या यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला तसेच ज्यांनी विना परवाना जाहिरात होर्डिंग आणि बोर्ड लावले आहेत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच यापुढे अनधिकृत होर्डिंग, विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्स इ. यावर परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून निष्कासन कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
| दोन दिवसाच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे
होर्डिंग – 35
फ्लेक्स, बोर्ड, बॅनर – 274
झेंडे – 18
फ्लेक्स, बोर्ड, बॅनर – 274
झेंडे – 18
पोस्टर – 46
किऑक्स – 32
एकूण – 405