Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल | पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढत आता रंगतदार होणार

Homeadministrative

Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल | पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढत आता रंगतदार होणार

Ganesh Kumar Mule Oct 24, 2024 4:40 PM

PMC Schools : Personality Devlopment : महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा!
Raksha Bandhan With Parvati Police| समाज रक्षणासह महिलांच्या संरक्षणासाठी ‘त्यांनी ‘ दिले वचन ! | पर्वती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमवेत रक्षाबंधन !
Pune Politics | मंचावर बसलेले अनेक चेहरे लवकरच मंत्रालयात जाणार | सुप्रिया सुळे यांच्या या विधानाने पर्वती विधानसभे साठी इच्छुक उमेदवारांना मिळाले बळ!

Aba Bagul Parvati Vidhansabha | ‘पर्वती’ साठी आबा बागुल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल | पर्वती विधानसभा मतदारसंघातून लढत आता रंगतदार होणार

 

Parvati Constituency – (The Karbhari News Service) – विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असलेल्या माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता येथील लढत आता रंगतदार होणार आहे. (Aba Bagul Pune)

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पर्वती मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यात यावा यासाठी आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अन्य नेत्यांना वारंवार भेटून साकडे घातले होते.त्यांना पक्षश्रेष्ठींनी अनुकूलता दर्शवली आहे. सध्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने,आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष , महाविकास आघाडी आणि अपक्ष म्हणून गुरुवारी (दि. २४ ) उमेदवारी अर्ज दाखल केला. जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे,असा ठाम विश्वास व्यक्त करताना यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच आणि पर्वती मतदारसंघात परिवर्तन करणारच असा निर्धारही आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे. परिणामी यंदा या मतदारसंघातील लढत रंगतदार होणार असून परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत.

-आबा बागुल यांची राजकीय कारकीर्द –

१९९२ पासून पुण्याच्या राजकीय पटलावर सक्रिय.
१९९२ ते २०२२ पर्यंत वॉर्ड असो किंवा प्रभाग त्याची रचना बदलली तरी निवडून येणे.
सलग ६ वेळा म्हणजेच ३० वर्षे नगरसेवक.
स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, गटनेते, उपमहापौर या पदांच्या माध्यमातून शहर विकासासाठी अनेक ठराव.
उपमहापौर पदाच्या माध्यमातून प्रथमच महापालिकेत राबविलेला ‘जनता दरबार’ प्रभावी.
समाजकारणात ४० वर्षाहून अधिक काळ सक्रिय.
*विविध पदांच्या माध्यमातून शहर विकासात योगदान .

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0