Aba Bagul Parvati | हजारो नागरिकांच्या साक्षीने आबा बागुल यांची ‘विजयी निर्धार सभा’
Parvati Assembly Constituency – अंबिका नगर भागातील राम मंदिरा जवळ, अप्पर येथे अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचारार्थ हजारो नागरिकांच्या साक्षीने ‘विजयी निर्धार सभा’ पार पडली.
यावेळी आबा बागुल म्हणाले, पर्वतीच्या हितासाठी ही निवडणूक लढतोय. प्रगतीसाठी, विकासासाठी, सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी आपण मला जनाधाराची ताकद दिली पाहिजे. मी 24 तास पर्वतीसाठी उभा होतो! यापुढेही राहील. तुमचे प्रश्न आणखी प्रभावीपणे सोडवण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, असे आवाहन करत 20 नोव्हेंबर रोजी आपल्या ‘हिरा’ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन पर्वतीकरांना केले.
COMMENTS