Aam Aadmi Party | ISRO | इसरोच्या शास्त्रज्ञांचे आणि देशवासीयांचे आम आदमी पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन
Aam Aadmi Party | ISRO | चंद्रयान-3 मोहीम (Chandrayaan 3 Mission) यशस्वी करत भारताला प्रगतीपथाकडे नेणाऱ्या इसरोमधील (ISRO) शास्त्रज्ञांचे आणि देशवासीयांचे आम आदमी पक्षातर्फे (Aam Aadmi Party) हार्दिक अभिनंदन करण्यात आले. (Aam Aadmi Party | ISRO)
२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताच्या इस्रो (ISRO) या अंतराळ विषयक संशोधन करणाऱ्या संस्थेने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अंतराळात प्रक्षेपित केलेल्या चंद्रयान ३ या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाय रोवले. आणि त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा पाय ठेवण्याचा बहुमान भारत देशाला मिळाला. आज पर्यंत अनेक देशांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या मोहिमा यशस्वी झाल्या नाहीत. रशियाचे लुना 25 हे यान देखील दोनच दिवसांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोसळले असल्याने भारताच्या यानाचे काय होणार याबद्दल साशंकता होती, परंतु शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अथक प्रयत्नानंतर आणि २०१९ मध्ये आलेल्या चंद्रयान २ च्या अपयशानंतर चंद्रयान ३ मध्ये केलेल्या बदलांमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला, तसेच चंद्रावर उतरणारा अमेरिका, रशिया आणि चीन नंतर जगातील चौथा देश ठरला.
भारताच्या या यशस्वी मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारत अधिक वेगाने प्रगती करेल आणि जगात एक वेगळे नावलौकिक प्राप्त करेल अशी आशा निर्माण झाली आहे.
सदर चंद्रयान ३ मोहिमेचा भाग असलेल्या सर्व शास्त्रज्ञांनी भारताला एक नवीन नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल आम आदमी पक्षातर्फे त्यांचे हार्दिक आभार तसेच अभिनंदन केले जात आहे शास्त्रज्ञांनी असेच प्रयत्न करून देशाचे नाव आणखी पुढे नावे हीच अपेक्षा आम आदमी पक्षाने व्यक्त केली आहे. तसेच ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेने तारांगण उभारले आहे, त्याच धर्तीवर पुण्यातही पुणे महापालिकेच्या माध्यमातून एक अंतराळ निरीक्षण व संशोधन केंद्र उभारले जावे ज्यामुळे शहरातील अनेक लहान मोठ्या मुलांना ग्रहताऱ्यांविषयी अभ्यास करता येईल आणि भविष्यात अनेक शास्त्रज्ञ हे पुण्यातूनही निर्माण होतील अशी अपेक्षा पक्षातर्फे व्यक्त केली गेली.