Road Repairing | PMC Pune | महापालिका शहरभरातील सर्व रस्ते करणार दुरुस्त!  – 217 कोटींच्या कामाला इस्टिमेट कमिटीची मान्यता 

HomeपुणेBreaking News

Road Repairing | PMC Pune | महापालिका शहरभरातील सर्व रस्ते करणार दुरुस्त!  – 217 कोटींच्या कामाला इस्टिमेट कमिटीची मान्यता 

Ganesh Kumar Mule Nov 01, 2022 2:20 PM

SRA | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा
Arvind Shinde | Governor | महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध | अरविंद शिंदे
Mohan Bhagwat | Pune | शनिवारी सरसंघचालक मोहन भागवत पुण्यात काय बोलणार?

महापालिका शहरभरातील सर्व रस्ते करणार दुरुस्त!

– 217 कोटींच्या कामाला इस्टिमेट कमिटीची मान्यता

पुणे | यंदा पावसाचा जोर जास्त दिवस राहिल्याने डागडुजी केलेले रस्ते नंतर खराब झाले होते. याबाबत महापालिकेच्या पथ विभागाने आता गंभीरपणे पाऊल उचलले आहे. महापालिका आता शहरभरातील दुरुस्त केलेले रस्ते सोडुन सर्व रस्ते दुरुस्त करणार आहे. यासाठी 217 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच इस्टिमेट कमिटीने मान्यता दिली आहे.
पुणे शहरात रस्त्यांचे जाळे पसरले आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात हे रस्ते खराब होतात. महापालिकेकडून याची तात्काळ दुरुस्ती केली जाते. यंदा मात्र रस्त्यांची अवस्था चांगलीच खराब झाली होती. कारण अतिरिक्त पावसाने डागडुजी केलेले रस्ते नंतर खराब झाले. याबाबत शहरातील नागरिकांकडून ओरड होत होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता याबाबत गंभीरपणे पाऊल उचलले आहे. महापालिका आता शहरातील सर्व रस्ते दुरुस्त करणार आहे. याबाबत पथ विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील महापालिका प्रशासनाकडून इस्टिमेट कमिटीसमोर ठेवण्यात आला होता.
याबाबत पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, सर्व क्षेत्रीय कार्यालयातील रस्त्यांची जबाबदारी विविध अधिकाऱ्यावर सोपवली आहे. यामध्ये 200 अधिक रस्त्यांचा समावेश आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 55 रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. या सगळ्यासाठी 217 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
– दुरुस्त करण्यात येणारे महत्वाचे रस्ते
सातारा रोड ते केके मार्केट
दत्तनगर चौक ते भूमकर पूल
नीलम ब्रिज ते दांडेकर चौक
धायरी गाव मेन रोड, सिंहगड रोड सर्व्हिस रोड
कर्वेनगर गावठाण ते सहवास सोसायटी
कमिन्स कॉलेज ते कर्वे नगर
नेहरू रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड इत्यादी