International Ozone Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा

Homeपुणेsocial

International Ozone Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा

Ganesh Kumar Mule Sep 19, 2022 2:21 AM

Plastic collection campaign | अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर महाविद्यालयात प्लास्टिक संकलन अभियानाचे उद्घाटन
PDEA | ओतूर महाविद्यालयात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Social Media Uses | सोशल मीडियाचा अतिवापर वाचन संस्कृतीस घातक | प्रा.डॉ. वसंत गावडे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर मधील राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ओझोन दिनाचे औचित्य साधून डॉ रमाकांत कसपटे यांचे ओझोन दिन विशेष याविषयी व्याख्यान व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अभय खंडागळे यांनी दिली.

आपल्या विशेष व्याख्यानामध्ये डॉ रमाकांत कसपटे यांनी ओझोन दिनाविषयी आपले मत व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओझोन दिन साजरा करण्यापाठीमागची पार्श्वभूमी तसेच महाविद्यालयीन युवकांनी क्लोरो फ्लोरो कार्बनच्या वापराविषयी व त्यापासून निर्माण धोक्याविषयी जाणीव जागृती करणे गरजेचे आहे असे नमूद केले. तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी ओझोन वायूचे जैव सृष्टीच्या दृष्टिकोनातून महत्व सांगितले तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी नवनवीन प्रकल्प तयार करून त्यातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच रोजगार निर्मिती होऊ शकते का या अनुषंगाने अभ्यास करावा असे आवाहन केले. सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये महेश शेंडे याने प्रथम क्रमांक, सायली अहीनवे हिने द्वितीय क्रमांक तर दिक्षा नयकोडी हिने तृतीय क्रमांक संपादित केला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ वसंत गावडे व हिंदी विभाग प्रमुख डॉ दत्तात्रय टिळेकर सर यांनी काम पाहिले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस एफ ढाकणे व इंग्रजी विभागातील डॉ ऐ के लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप कदम, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, सहसचिव मा. ए.एम. जाधव यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ निलेश काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ भूषण वायकर यांनी व्यक्त केले.