Water Budget | PMC Pune | पुणे शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता!  | महापालिकेकडून जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर 

HomeपुणेBreaking News

Water Budget | PMC Pune | पुणे शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता!  | महापालिकेकडून जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर 

Ganesh Kumar Mule Sep 16, 2022 9:56 AM

Deepali Dhumal | Sharad Pawar | ketaki Chitale : केतकी चितळे सारख्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा बीमोड करणे आवश्यक : दिपाली धुमाळ यांची मागणी 
Maratha and OBC Reservation | आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक | राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी
Water Cut In Pune | गुरुवारी बंद ठेवल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ही केली मागणी!

पुणे शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता!

| महापालिकेकडून जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर

पुणे | पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट सादर करत ही मागणी केली आहे. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सन २०२२ – २०२३ मध्ये पुणे महानगरपालिकेसाठी आवश्यक वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार तयार करण्यात आले  आहे. सन २०१९ मध्ये पुणे महानगरपालिकेकडून आधार नोंदणी व इतर साधनांव्दारे माहिती संकलीत करण्यात आली असून पुणे शहराची लोकसंख्या एकूण ५२,०८,४४४ इतकी निश्चित झाली होती व संदर्भान्वये वार्षिक २% वाढ गृहीत धरुन ५४,१८,८६४ इतक्या लोकसंख्येसाठी सन २०२१-२०२२ चे पाण्याचे अंदाजपत्रक देण्यात आले होते.
सन २०२२ मध्ये या लोकसंख्येमध्ये २% वाढ गृहीत धरण्यात आली आहे त्यानुसार होणाऱ्या ५५, २७, २४१ या लाकसंख्येस १५० एल.पी.सी. डी. प्रमाणे तसेच महानगरपालिकेमध्ये नव्याने
समाविष्ट झालेल्या ११ गावांची लोकसंख्या (२९२८५७) तसेच नव्याने समाविष्ठ झालेल्या २३ गावांच्या लोकसंख्येस (८०००००) ७० एल.पी.सी. डी. प्रमाणे पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ही लोकसंख्या 69 लाख 41 हजार 460 होत आहे. त्यानुसार ही मागणी करण्यात आली आहे.
शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये 35% पाणी गळती गृहीत धरण्यात आली आहे. पाणीगळती ही 7 टीएमसी हुन अधिक आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट सादर करत ही मागणी केली आहे. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.