PMC Recruitment Update News | महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 87 हजार 471 अर्ज दाखल 

HomeपुणेBreaking News

PMC Recruitment Update News | महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 87 हजार 471 अर्ज दाखल 

Ganesh Kumar Mule Aug 11, 2022 1:02 PM

Pune PMC News | आचारसंहिता संपल्यावर एकत्रित तीन वर्षाचे महर्षी वाल्मिकी पुरस्काराचे वितरण! | महापालिका आयुक्तांचे नगरसचिव विभागाला आदेश
Arvind Shinde | PMC Pune | माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून टेंडर प्रक्रिया लांबविणाऱ्या समाज कंटकांवर फौजदारी कारवाई करा | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Pune-Bengaluru highway Accident | पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी काय करणार उपाययोजना?

महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 87 हजार 471 अर्ज दाखल

| महापालिका प्रशासनाची माहिती

पुणे |  पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये 1. सहायक विधी अधिकारी  (श्रेणी 2) पदा साठी 690 अर्ज आले आहेत. लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) साठी 63948 अर्ज दाखल झाले आहेत.  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) साठी 17361,  कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) साठी 2146,  कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3)  साठी 25 तर  सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी 3) साठी 3201 असे एकूण 87 हजार 471 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
महापालिकेकडे सगळे अर्ज एकत्रित झाल्यानंतर आता परीक्षेचे केंद्र ठरवले जातील. त्यानंतर परीक्षेची तारीख ठरेल. उमेदवारांना ही माहिती लवकरच दिली जाईल. असे ही उपायुक्त इथापे यांनी सांगितले.