CM Uddhav Thackeray | Sharad pawar | याआधी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यापासून दोनदा रोखले होते | इंडिया टुडे 

HomeBreaking NewsPolitical

CM Uddhav Thackeray | Sharad pawar | याआधी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यापासून दोनदा रोखले होते | इंडिया टुडे 

Ganesh Kumar Mule Jun 27, 2022 3:39 PM

Shivsena | CM Uddhav Thackeray | वर्धापन दिन साजरा करताना मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले? 
Shivsena | Kothrud | एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन 
CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा | मुख्यमंत्री जनतेला काय म्हणाले?

याआधी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यापासून दोनदा रोखले होते | इंडिया टुडे 

राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर येऊन पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करणार होते. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ठाकरेंना असा टोकाचा निर्णय घेण्यापासून रोखल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारांनी याआधी उद्धव ठाकरेंना एकदा नाही तर दोनदा राजीनामा देण्यापासून रोखलं आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची इच्छा असेल तर, मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असा देखील दावा केला होता की, आपण शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासदेखील तयार आहोत. मात्र, माझ्या शिवसैनिकांनी मला हे समोरासमोर येऊन सांगावे असे ठाकरे म्हणाले होते. सर्वोच्च न्यायलयाकडून बंडखोरांना दिलासादरम्यान, आज एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. तर बंडखोर आमदारांना 12 जुलैपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. तसेच 12 तारखेपर्यंत अपात्रतेची कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. याशिवाय पुढील सुनावणीपर्यंत स्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे.
सर्वोच्च  न्यायालयातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत न्यायालयाचा आजचा निकाल हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय असल्याचं म्हटलं आहे.शिंदेगट लवकरच आणणार अविश्वास ठरावन्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर, शिंदे गट लवकरच महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे पत्र पाठवणार असून, सध्याच्या ठाकरे सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.