Shivsena | Pune | देशपांडेच्या जाण्याने शिवसेनेला काडीचा फरक पडत नाही  | शहर प्रमुख गजानन थरकुडे

HomeपुणेBreaking News

Shivsena | Pune | देशपांडेच्या जाण्याने शिवसेनेला काडीचा फरक पडत नाही  | शहर प्रमुख गजानन थरकुडे

Ganesh Kumar Mule May 16, 2022 4:08 PM

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray | पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा
Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन 
Shivsena | Kothrud | एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे मारत कोथरूड मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन 

देशपांडेच्या जाण्याने शिवसेनेला काडीचा फरक पडत नाही

: शहर प्रमुख गजानन थरकुडे

पुणे : शाम देशपांडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. यावर शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी देशपांडे यांच्या जाण्याने शिवसेनेला काडीचाही फरक पडत नाही, असा टोला लगावला आहे.

थरकुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार शिवसेना ही निष्ठावंतांची संघटना आहे. शाम देशपांडे यांना महापालिकेत तीनवेळा प्रतिनिधीत्व दिले. स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापालिकेतील गटनेतेपद, शहरप्रमुख, विधानसभेची उमेद्वारी अशी पदे देऊनही शाम देशपांडे समाधानी नव्हते. शिवसेनेबद्दल कृतघ्न असण्याऐवजी त्यांनी कृतघ्नपणा दाखविला आहे. ते शिवसेनेत सक्रियही नव्हते, त्यामुळे त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्यामुळे शिवसेनेला काडीचाही फरक पडणार नाही, असे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.  शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे पुण्यनगरीत शाम देशपांडे यांनी बोर्ड लावले होते. यावरूनच देशपांडे यांची भूमिका स्पष्ट झाली होती. शिवसेनेने भरभरून देऊनही देशपांडे यांना त्याची जाणीव नसणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. ते शिवसेनेत सक्रिय नव्हतेच त्यामुळे ते असले किंवा नसले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेना हा निष्ठावंत शिवसैनिकांचा पक्ष आहे, असे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0