Sharad pawar | Ketaki Chitale | केतकी चितळे कोण, मी तिला ओळखत नाही :शरद पवारांची प्रतिक्रिया

HomeBreaking NewsPolitical

Sharad pawar | Ketaki Chitale | केतकी चितळे कोण, मी तिला ओळखत नाही :शरद पवारांची प्रतिक्रिया

Ganesh Kumar Mule May 14, 2022 3:22 PM

NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांची नियुक्ती
Heat of PMC Election 2022 : मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!
Amit Shah Pune Tour | महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार! | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

केतकी चितळे कोण, मी तिला ओळखत नाही

:शरद पवारांची प्रतिक्रिया

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकी विरोधात पुण्यासह आणि ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत शरद पवारांना विचारलं, कोण केतकी चितळे मी तिला ओळखत नाही, असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्याचं टाळलं आहे. संबंधित व्यक्तीला आपण ओळखत नसून नेमकं प्रकरण काय आहे, हेही मला माहीत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ते हिंगोली येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

जितेंद्र आव्हाडांसह सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केतकीवर कारवाईची मागणी केली. तिच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, तिला ठाणे क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात येत असताना तिच्यावर काळी शाई फेकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.