5 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना लवकरच मिळणार कॉर्बेवॅक्स?
: DCGI ची शिफारस
भारतात, मुलांमध्ये कोविड-19 लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले आणि पहिली लस 15-18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात आली. यानंतर 16 मार्च रोजी या मोहिमेचा विस्तार करत 12 वर्षांवरील मुलांनाही त्यात समाविष्ट करण्यात आले. सध्या भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोविडच्या दोन लसी दिल्या जात आहेत. या सर्वामध्ये देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, आता ही लस 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांवर वापरली जाऊ शकते.गुरूवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 2,380 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्यादेखील 13,433 वर पोहोचली आहे. देशीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.76 टक्क्यांवर नोंदवला गेला आहे.
COMMENTS