महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
पुणे : पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीद्वारा मनपा अधिकारी/सेवकांच्या सुप्त गुणांना वाव देवून परस्परांमध्ये सहकार्य, समन्वयाची भावना व गुणवत्तावाढ करण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन अशा चार क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. 30 आणि 31 मार्च या कालावधीत या स्पर्धा होतील.
: अशा असतील अटी
१. क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि.३०/३/२०२२ रोजी सकाळी १० वा. सणस मैदान, पुणे येथे होईल. सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे.
२. उपरोक्त सर्व स्पर्धापैकी केवळ दोनच स्पर्धांमध्ये स्पर्धकाला सहभागी होता येईल,
३. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी खात्यामार्फत कामगार कल्याण विभागाकडे अर्ज दिनांक २८/३/२०२२ अखेर सादर करण्यात यावेत.
४. सहभागी खेळाडूंनी वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित राहून समन्वयकाशी संपर्क साधावा.
५. सर्व सहभागी खेळाडूंनी आपापली ओळखपत्रे संबंधित समन्वयकास दाखविणे आवश्यक आहे.
६. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील.
७. सहभागी खेळाडूंनी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग न घेतल्यास त्यांची गैरहजेरी संबंधित कार्यालयास कळविण्यात येईल.
8. सदर क्रीडा स्पर्धा फक्त कामगार कल्याणनिधी सभासदांसाठीच आहेत.

असे कार्यकारी समिती, कामगार कल्याण निधी, पुणे महानगरपालिका यांनी कळवले आहे.
COMMENTS