एमआयएम सोबत जाण्याबाबत शरद पवारांनी केले महत्वाचे वक्तव्य
पुणे : कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘एमआयएम’सोबत जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.
एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘एमआयएम’ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांना केले आहे .या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चेला पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पूर्ण विराम दिला आहे. माळेगाव येथील निवासस्थानी रविवारी (दि २०)सायंकाळी पत्रकारांशी पवार बोलत होते.
COMMENTS