Honoring women officers  : महापालिकेच्या महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान  : सन्मान देताना भेदभाव केल्याने वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये नाराजी 

HomeपुणेPMC

Honoring women officers : महापालिकेच्या महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान  : सन्मान देताना भेदभाव केल्याने वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये नाराजी 

Ganesh Kumar Mule Mar 18, 2022 10:11 AM

Pune PMC Canteen | महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हक्काचे उपहार गृह! | पीएमसी एम्प्लॉईज युनियन च्या मागणीला यश | सेवकांसाठी असणाऱ्या उपहारगृहास आयुक्तांची मान्यता 
PMC : Labor movement : कामगार नेते कॉम्रेड आप्पासाहेब भोसले यांच्या १९ वा स्मृतीदिन निमित्त पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे विनम्र अभिवादन आणि लाल सलाम
PMC Employees Time Bound Promotion | आश्वासित प्रगती योजना स्थगिती वरून  महापालिका कमर्चारी संघटना आक्रमक  | कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो? 

महापालिकेच्या महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

: सन्मान देताना भेदभाव केल्याने वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापालिकेतील महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी यांनी कोविड काळात केलेल्या कामाप्रती त्यांचा सन्मान करण्यात आला. पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सन्मान देताना भेदभाव केला असल्याची भावना काही वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

: सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पी एम सी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने दरवर्षी महिला अधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो. कोविड कालावधीत हा कार्यक्रम घेण्यात आला नव्हता. यावर्षी मात्र नुकताच हा कार्यक्रम घेण्यात आला. महापालिकेतील महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी यांनी कोविड काळात केलेल्या कामाप्रती त्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांचे हस्ते महिला अधिकारी व सेवकांचा सन्मान करण्यात आला. मात्र सन्मान देताना भेदभाव केला असल्याची भावना काही वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान यावेळी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम संयोजन सर्व महिला पदाधिकारी पी एम सी एम्प्लॉईज युनियन यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0