Mayor Office at PMC : पुणे महापालिकेत गोंधळ : महापौर कार्यालयावर फेकली शाई 

HomeपुणेBreaking News

Mayor Office at PMC : पुणे महापालिकेत गोंधळ : महापौर कार्यालयावर फेकली शाई 

Ganesh Kumar Mule Mar 07, 2022 1:02 PM

PMC : Bus Toilet : “ती” बस टॉयलेटच्या वापरासाठी आता पैसे नाही पडणार! 
Water Storage | MWRRA | सरकार शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार | MWRRA कडे पुण्याच्या पाण्याबाबत सुनावणी 
Unauthorized hoardings : PMC : विद्युत पोलसहित शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट! : प्रशासनाची कारवाई थंडावल्याने कामकाजावर प्रश्नचिन्ह

पुणे महापालिकेत गोंधळ : महापौर कार्यालयावर फेकली शाई

पुणे : पुणे महापालिकेमध्ये (PMC) गोंधळ झाला आहे. महापौर कार्यालयाच्या फलकावर काळी शाई फेकण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामुळं पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेत (Security)  वाढ करण्यात आली आहे.

पुणे महानगर पालिकेतील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग आज तुटल्याची घटना घडल्याने हा वादंग झाला. या पुतळ्याभोवती असलेलं डेकोरेशन खाली उतरवताना ही घटना घडली. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध करत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावरील फलकावर शाई फेकली. पुणे महानगरपालिकेनं या पुतळ्याचं काम घाई-गडबडीत केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.