BJP : PMC Election : महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप

HomeपुणेBreaking News

BJP : PMC Election : महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप

Ganesh Kumar Mule Feb 27, 2022 4:06 AM

Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी
Ram Mandir Ayodhya | राम मंदिर, भाजप आणि कारसेवक |  सांस्कृतिक आणि राजकीय विविधतेचे धागे एकत्र गुंफणे हे आहे आव्हान 
PMC Budget | महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?

महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप

पुणे : पुणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जातील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, शुक्रवारी (ता.२५) प्रचारप्रमुख म्हणून राजेश पांडे यांची घोषणा केल्यानंतर आज हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल पक्ष कार्यालयात आयोजित केली होती. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे हे यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आपली निवडणुकीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. बूथ स्तरापर्यंतच्या रचना पूर्ण झाल्या आहेत. शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणूक व्यवस्थापन समितीची रचना लवकरच पूर्ण होईल. जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत भाजपचे शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील.