अभय योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु!
: फक्त निवासी मिळकतींसाठी योजना
पुणे : महापालिकेने निवासी मिळतीसाठी अभय योजना लागू केली आहे. 1 कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारासाठी ही योजना राबवबयात येत आहे. या योजनेची मुदत 26 जानेवारी पर्यंत होती. ती आता वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. स्थायी समितीने हा निर्णय घेतला होता. शिवाय ही योजना सर्वासाठी लागू करावी, असे ही समितीने म्हटले होते. मात्र त्यावर अजून प्रशासनाकडून अंमल करण्यात आलेला नव्हता. आयुक्तांनी आता या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. आजपासून म्हणजे 9 फेब्रुवारी पासून यावर अंमल सुरु झाला आहे. मात्र ही ही योजना निवासी मिळकतींसाठीच असेल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत महापालिकेने जाहीर आवाहन देखील केले आहे.
: काय आहे महापालिकेचे जाहीर आवाहन
मिळकतकर थकबाकी वसुली अभय योजना २०२१-२२ जाहीर आवाहन
मिळकतकराची रक्कम न भरल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार नियम ४१ नुसार शास्तीची आकारणी केलेली असल्याने ती माफी करणेबाबत खालीलप्रमाणे अभय योजना जाहीर करणेत येत आहे. पुणे शहरातील निवासी मिळकतींवर मिळकत कराची रक्कम १ कोटी व त्यापेक्षा कमी थकबाकी आहे. अशा मिळकतींवरील कराची थकीत बाकी वसुल करणेसाठी एकरकमी संपूर्ण रक्कम (थकबाकीसह) मिळकतदारांनी दिनांक ९/०२/२०२२ ते दि.२८/०२/२०२२ अखेर या कालावधी दरम्यान भरल्यास, भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या एकुण २% शास्ती रकमेच्या ७५% शास्ती रक्कमेस माफी देऊन शिल्लक रक्कम भरून घेणेत येईल. तरी पुणे शहरातील ज्या निवासी मिळकतीवर मिळकत कर रक्कम १ कोटी व त्यापेक्षा कमी थकबाकी आहे. अशा मिळकतकर थकबाकीदारांनी त्यांचे मिळकतकराची थकीत बाकी एकरकमी सवलतीच्या दराने पुणे मनपाचे सर्व क्षेत्रीय, संपर्क कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्र तसेच आयसीआयसीआय, एचडीएफसी, कॉसमॉस, बँक ऑफ महाराष्ट्र व इतर पुणे मनपाशी संलग्न असणाऱ्या बँकेच्या पुणे शहरातील सर्व शाखांमध्ये भरता येईल. तसेच ऑनलाईन पेमेंटसाठी www punecorporation.org. propertytax@punecorporation org या वेबसाईटवरून भरावे. २% शास्ती रकमेवर देण्यात आलेल्या ७५ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, ही विनंती.
COMMENTS