Annasaheb Waghire College : स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत : रश्मी पटवर्धन यांनी व्यक्त केले विचार 

Homeपुणेcultural

Annasaheb Waghire College : स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत : रश्मी पटवर्धन यांनी व्यक्त केले विचार 

Ganesh Kumar Mule Feb 09, 2022 3:48 PM

Annasaheb Waghire College | A Grade | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास A मानांकन | नॅक कमिटीची भेट
Marathi Bhasha Gaurav Din | युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे | प्रा डॉ. वसंत गावडे
Plastic collection campaign | अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर महाविद्यालयात प्लास्टिक संकलन अभियानाचे उद्घाटन

स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत

: रश्मी पटवर्धन यांनी व्यक्त केले विचार

पुणे : स्त्री पुरुष दोघांनीही परस्परांसोबत स्पर्धा किंवा द्वेष करायला नको, तसेच स्त्री-पुरुषांमध्ये कोणीही थोर अथवा लहान नसून प्रत्येकाने परस्परांचा सन्मान राखायला हवा. स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत व त्या पद्धतीनेच त्यांचे वर्तन असायला हवे. असे मत रश्मी पटवर्धन यांनी व्यक्त केले.

ओतुर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘लिंगभाव संवेदनशीलता जाणीव-जागृती’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एम शिंदे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे यांनी दिली.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही एम शिंदे, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या मा. स्वाती रानडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे, मराठी विभाग प्रमुख डॉ व्ही वाय गावडे, भूगोल विभाग प्रमुख डॉ आर एन कसपटे, डॉ आर टी काशिदे इत्यादी मान्यवर व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानामध्ये रश्मी पटवर्धन यांनी लिंगभाव संवेदनशीलता जाणीव जागृती या विषयाबद्दल मनोगत व्यक्त करताना सुरुवातीला लिंग व लिंगभाव ही संकल्पना विद्यार्थ्यांना सांगितली. स्त्री पुरुष दोघांनीही परस्परांसोबत स्पर्धा किंवा द्वेष करायला नको, तसेच स्त्री-पुरुषांमध्ये कोणीही थोर अथवा लहान नसून प्रत्येकाने परस्परांचा सन्मान राखायला हवा. स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत व त्या पद्धतीनेच त्यांचे वर्तन असायला हवे,  असे नमूद केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ व्ही एम शिंदे यांनी सध्याच्या काळामध्ये स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा विचार करता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव संवेदनशीलता याविषयी जाणीव जागृती करून देणे ही काळाची गरज आहे असे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अमोल बिबे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ निलेश काळे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ भूषण वायकर व प्रा अजय कवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.