PMC : Rapid Antigen Test : कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना अँटीजेन टेस्ट बंधनकारक!  

HomeBreaking Newsपुणे

PMC : Rapid Antigen Test : कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना अँटीजेन टेस्ट बंधनकारक!  

Ganesh Kumar Mule Jan 07, 2022 6:23 AM

Merged 23 Villages : PMC : समाविष्ट 23 गावांतील 626 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार
Covid 19 Grant : अनुदान मिळवण्यासाठी चुकीची प्रमाणपत्रे सादर करू नका  : पुणे महापालिकेचे नागरिकांना आवाहन 
Registered Hawkers : आता नोंदणीकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा  : नियमाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई 

कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यास मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना अँटीजेन टेस्ट बंधनकारक!

: नागरिक आणि मनपा कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेत अँटीजेन टेस्ट ची सुविधा

पुणे : शहरात आणि एकूणच राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. पुणे शहरात तर कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच दिसते आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. शिवाय नागरिक देखील महापालिकेत भेट देत असतात. त्यामुळे नागरिक आणि मनपा कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेत रॅपिड अँटीजेन टेस्ट ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका भवन मधील जुन्या जीबी हॉल मध्ये  टेस्ट करता येईल. असे नियोजन महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

: जुन्या जीबी हॉल मध्ये करता येणार टेस्ट

जागतिक आरोग्य संघटना ,केंद्र शासन स्तरावरील आरोग्य तज्ञ व राज्यस्तरीय विशेष कार्यकारी दल यांनी कोव्हिड-१९ ची तिसरी लाट येणाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे कोव्हिड -१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्राप्त मार्गदर्शक सुचनाप्रमाणे कोव्हिड -१९ च्या तिस-या लाटेच्या नियंत्रण आणनेकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व खात्याकडील खातेप्रमुख ,विभागप्रमुख व सेवकांना कोव्हिड -१९ आजाराची कोणतीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत रैपिड अॅन्टीजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. तरी कोव्हिड -१९ आजाराची कोणतीही सौम्य लक्षणे आढळल्यास संबंधीतांनी पुणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, तीसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जीबी हॉल) येथे रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्याचे आयोजन कार्यालयीन वेळेत करण्यात आले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये विविध खात्यामध्ये कामकाजाकरीता भेट देणा-या नागरीकांना कोव्हिड -१९ आजाराची कोणतीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य विभाग, तीसरा मजला छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जीबी हॉल) येथे रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करण्याचे नागरीकांना सुचित करण्यात यावे. असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0