आगामी महापालिका निवडणुका वेळेवर होणार की नाही? अजित पवारांनी दिले हे संकेत!
पुणे : राज्यातील आगामी निवडणुकांबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
पवार म्हणाले, “निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. आम्ही अधिवेशनाच्या काळात यासंदर्भात दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं ठराव केला होता, तो निवडणूक आयोगाला पाठवला आहे. त्यानंतर राज्यातील परिस्थिती एकदम बदलली आहे. कारण अधिवेशन संपलं २७ तारखेला त्यानंतर बरेच मंत्री, आमदार मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह झाले. तुमच्या आमच्या घरातीलही अनेक लोक सध्या पॉझिटिव्ह झाले आहेत. ही सगळीपरिस्थती पाहता आता निवडणूक आयोगानं याबाबत निर्णय घ्यायचा आहे. राज्यातील संसर्ग निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे”
COMMENTS