Pune PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ | मुख्य लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक जारी 

पुणे महानगरपालिकेने अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्के केला आहे.

Homeadministrative

Pune PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ | मुख्य लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक जारी 

Ganesh Kumar Mule Nov 27, 2026 6:11 PM

8th Central Pay Commission DA News |  केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) शून्य होणार! गणना कधी बदलेल ते जाणून घ्या 
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका|  महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी | जाणून घ्या काय आहे प्रकरण
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता भेट मिळाला का?  सर्क्युलर व्हायरल झाले | पण… थांबा आणि काळजीपूर्वक वाचा 

Pune PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ | मुख्य लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक जारी

नोव्हेंबरच्या पगारात चार महिन्यांची थकबाकी; निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही दिलासा

 

PMC Employees DA Hike – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिका प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या ६० टक्के दराने मिळणारा महागाई भत्ता आता ६३ टक्के दराने मिळणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आली असून, जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांची थकबाकी नोव्हेंबर २०२६ च्या वेतनासोबत म्हणजेच डिसेंबरमध्ये मिळणाऱ्या पगारात अदा केली जाणार आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने  कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे.

पुणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि सेवकांना १ नोव्हेंबर १९७७ पासून केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे धोरण लागू आहे. केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वेळोवेळी होणारे बदल महापालिका कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यास महापालिका सभेने २३ डिसेंबर १९७७ रोजी ठराव क्रमांक ३७२ अन्वये धोरणात्मक मान्यता दिली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात येते.

सद्यस्थितीत ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासून ६० टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्के झाला आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सुधारित दराने महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यास महापालिका आयुक्तांनी  मान्यता दिली आहे. त्यानुसार आता महापालिका कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२६ पासून ६३ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

चार महिन्यांची थकबाकी डिसेंबरमध्ये मिळणार

महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जुलै २०२६ ते ऑक्टोबर २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्यातील ३ टक्के वाढीची थकबाकी नोव्हेंबर २०२६ च्या वेतनासोबत अदा केली जाणार आहे. म्हणजेच डिसेंबर २०२६ मध्ये मिळणाऱ्या पगारात कर्मचाऱ्यांना ही थकबाकी मिळणार आहे. याशिवाय नोव्हेंबर महिन्यापासून नियमित वेतनात ६३ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही लाभ

या निर्णयाचा लाभ केवळ सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही मिळणार आहे. त्यांच्यासाठी जुलै २०२६ ते नोव्हेंबर २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीतील सुधारित महागाई भत्त्याची थकबाकी जानेवारी २०२७ मध्ये मिळणाऱ्या निवृत्ती वेतनासोबत अदा केली जाणार आहे.

खातेप्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांना सूचना

मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा सह महापालिका आयुक्त उल्का कळसकर यांनी हे परिपत्रक जारी केले आहे. सुधारित महागाई भत्त्याची थकबाकी अदा करताना संबंधित अंदाजपत्रकीय तरतुदीवर खर्च टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दरमहा दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा खर्च संबंधित खात्याच्या वेतनविषयक तरतुदीतून करण्यास सांगण्यात आले आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खातेप्रमुख आणि महापालिका सहाय्यक आयुक्तांनी आपल्या नियंत्रणाखालील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही पूर्ण करावी, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: