Pune PMC News | पुणे महापालिकेच्या पाच सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल

पुणे महापालिकेच्या पाच सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल; आयुक्तांचे कार्यालयीन आदेश जारी.

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या पाच सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल

Ganesh Kumar Mule Nov 04, 2026 9:03 PM

Ring Road | Pune| रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार – मंत्री शंभूराज देसाई
Contributed Medical Assistance Scheme : PMPML : पीएमपी कर्मचाऱ्यांना आरोग्य बिलासाठी देखील वाटच पाहावी लागणार  : 4 कोटी देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला 
Illegal Hoardings on Light pole : Wireman : विद्युत पोल वरील अनधिकृत जाहिरात फलक : वायरमन वर जबाबदारी निश्चित करणार 

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या पाच सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल

| क्षेत्रीय कार्यालयांसह विभागांची जबाबदारी बदलली

Naval Kishore Ram IAS – The Karbhari News Service –  पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाचा फेरबदल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाच सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदलांनुसार काही अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी बदलण्यात आली असून, काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त विभागीय जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका आयुक्त कार्यालयाकडून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना नव्याने सोपविण्यात आलेल्या विभागांचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणती जबाबदारी?

कार्यालयीन आदेशातील  पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

1. सुचिता पानसरे : यांच्याकडे यापूर्वी नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

2. इंद्रायणी करचे  : यांच्याकडे यापूर्वी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

3. सोमनाथ आढाव : यांच्याकडे यापूर्वी मालमत्ता  व व्यवस्थापन विभागाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच मालमत्ता  व व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे.

4. गोविंद दांगट : यांच्याकडे यापूर्वी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे येरवडा वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

5. बालगुडे प्रकाश शिवराम : यांच्याकडे यापूर्वी येरवडा कळस धानोरी  क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे क्रीडा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: