Pune Water Supply News | दिवाळीनिमित्त पुणेकरांना दिलासा! गुरुवारची नियोजित पाणीकपात रद्द | उद्या शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा
Pune Water Cut – The Karbhari News Service – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नागरिकांना दिलासा दिला आहे. गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी करण्यात येणारी नियोजित पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला आदेश दिले होते. त्यामुळे गुरुवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. (PMC Water Supply Department)
पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत नागरिकांना सूचना जारी केली आहे. दिवाळी निमित्त गुरुवारची नियोजित पाणीकपात रद्द करण्यात आल्याचे या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित दिवशी शहरातील नागरिकांना नेहमीच्या वेळेनुसार पाणी उपलब्ध होणार आहे.
राज्य सरकारने केलेल्या १० टक्के पाणीकपातीच्या सुचने नुसार पुणे महानगरपालिकेकडून दर गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. मात्र, दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गुरुवारची पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी नागरिकांनी पाणीकपातीबाबत कोणतीही चिंता करू नये. पाणीपुरवठा नेहमीच्या वेळापत्रकानुसारच केला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

COMMENTS