Pune PMC News |  पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या हस्ते हरिश्चंद्र गोरे यांना ६ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान. सोबत मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे.

Homeadministrative

Pune PMC News |  पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

Ganesh Kumar Mule Oct 21, 2026 7:02 PM

International Right to Information Day | पुणे महापालिका साजरा करणार  “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन”! 
PMC Employees Retirement | पुणे महापालिकेचे (PMC) ४१ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!
Home Loan for PMC Employees | पुणे जिल्ह्यात कुठेही घर घेण्यासाठी महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या गृहकर्जाचा लाभ घेण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन 

Pune PMC News |  पुणे महापालिकेच्या अपघात विमा योजनेतून कर्मचाऱ्याला ६.२५ लाखांची मदत

| २०१६ पासून योजना सुरू; आतापर्यंत २६ सेवकांना आणि त्यांच्या वारसांना २ कोटी ८० लाखांहून अधिक रक्कम अदा

 

PMC Labour Welfare Department – The Karbhari News Service –  पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतून आणखी एका कर्मचाऱ्याला आर्थिक मदत देण्यात आली आहे. आरोग्य कार्यालयातील लिपिक टंकलेखक हरिश्चंद्र श्रीरंग गोरे यांना अपघातात डाव्या हाताच्या अंगठ्याचे दोन पेरे तुटल्याने या योजनेअंतर्गत ६ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर (Prajit Nair IAS) यांच्या हस्ते बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी हा धनादेश प्रदान करण्यात आला. (Pune Municipal Corporation – PMC)

| २०१६ पासून अपघात विमा योजना कार्यान्वित

महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर पुणे महापालिकेत २०१६ पासून कायम आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांना तसेच संबंधित प्रकरणांमध्ये त्यांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाते.

महापालिकेच्या कामगार कल्याण विभागामार्फत या योजनेअंतर्गत आजपर्यंत २६ सेवकांना किंवा त्यांच्या वारसांना एकूण २ कोटी ८० लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक मदत अदा करण्यात आली आहे. अपघातामुळे कर्मचाऱ्यांवर ओढवणाऱ्या आर्थिक संकटाच्या काळात ही योजना आधार देणारी ठरत आहे.

| अपघातात अंगठ्याचे दोन पेरे तुटले

आरोग्य कार्यालयात लिपिक टंकलेखक म्हणून कार्यरत असलेले हरिश्चंद्र श्रीरंग गोरे यांचा २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे दोन पेरे तुटले होते. या प्रकरणी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत त्यांना ६ लाख २५ हजार रुपयांची मदत मंजूर करून धनादेशाद्वारे देण्यात आली.

हा धनादेश अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाचे खातेप्रमुख तथा मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे उपस्थित होते.

| आर्थिक मदतीबद्दल महापालिकेचे आभार

अपघातामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळाल्याबद्दल संबंधित कर्मचारी हरिश्चंद्र गोरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आभार मानले. महापालिकेच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमुळे अपघातग्रस्त सेवकांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: