Pune Grand Tour 2027 | बाणेर-गणेशखिंड रस्त्यावरील कामांवरून आयुक्त, जिल्हाधिकारी नाराज! | टाटा प्रोजेक्ट्सला डेडलाईन

या बैठकीस जिल्हाधिकारी, पुणे, पीएमआरडीएचे आयुक्त, अपर पोलीस आयुक्त  मनोज पाटील, पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Homeadministrative

Pune Grand Tour 2027 | बाणेर-गणेशखिंड रस्त्यावरील कामांवरून आयुक्त, जिल्हाधिकारी नाराज! | टाटा प्रोजेक्ट्सला डेडलाईन

Ganesh Kumar Mule Oct 19, 2026 8:41 PM

Ganesh festival | गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक होणार या दिवशी  | गणेशत्सवाचे होणार नियोजन
ChatBot | महापालिकेशी संबंधित माहिती सहजपणे नागरिकांना उपलब्ध करून देणेकरीता महापालिका ChatBot प्रणाली वापरणार 
Smart Identity Card | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘स्मार्ट ओळखपत्र’ अनिवार्य  | 10 ते 13 लाखाचा होणार खर्च 

Pune Grand Tour 2027 | बाणेर-गणेशखिंड रस्त्यावरील कामांवरून आयुक्त, जिल्हाधिकारी नाराज! | टाटा प्रोजेक्ट्सला डेडलाईन

| ३० नोव्हेंबर व ३१ डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश

 

Pune News – The Karbhari News Service – पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर बाणेर रोड व गणेशखिंड रोडवरील मेट्रो मार्गिका ३ अंतर्गतच्या रस्ते विकासकामांबाबत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पीएमआरडीए आयुक्त यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निकृष्ट कारागिरी, अपूर्ण फिनिशिंग आणि प्रभावी देखरेखीचा अभाव दिसून आल्याने, ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश टाटा प्रोजेक्ट्सला देण्यात आले आहेत. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे महानगरपालिका इमारतीत झालेल्या आढावा बैठकीनंतर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

 

या बैठकीस जिल्हाधिकारी, पुणे, पीएमआरडीएचे आयुक्त, अपर पोलीस आयुक्त  मनोज पाटील, पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. बाणेर रोड व गणेशखिंड रोडवरील मेट्रो मार्गिका ३ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांचा, प्रलंबित कामांचा, वाहतूक व्यवस्थेचा तसेच रस्ते सुरक्षितता व कामांच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

कामांच्या दर्जावर तीव्र नाराजी

जिल्हा न्यायालय ते बालेवाडी या मेट्रो मार्गिका ३ वरील रस्त्यांची दुरुस्ती, मध्य दुभाजकांची कामे तसेच संबंधित विकासकामांच्या दर्जाबाबत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पीएमआरडीए आयुक्त यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः मेट्रो मार्गिका ३ खालील रस्ता दुभाजकांच्या कामांमध्ये योग्य रेषा व पातळीचा अभाव, निकृष्ट कारागिरी, अपूर्ण फिनिशिंग तसेच प्रभावी देखरेखीचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

टाटा प्रोजेक्ट्सला दोन डेडलाईन

३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत : पुणे ग्रँड टूर २०२७ च्या सुमारे ४.५ किमी मार्गावरील मध्य दुभाजकांची दुरुस्ती व उर्वरित कामे
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत : बाणेर रोड व गणेशखिंड रोडवरील उर्वरित कामे व आवश्यक सुधारणा

संयुक्त कार्यगट व साप्ताहिक अहवाल

कामांमध्ये समन्वय राखण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा पथ विभाग, पीएमआरडीए, टाटा प्रोजेक्ट्स व वाहतूक पोलीस विभाग यांचा संयुक्त कार्यगट स्थापन केला जाणार आहे. हा गट प्रलंबित कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेईल आणि साप्ताहिक प्रगती अहवाल महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आयुक्त तसेच अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील यांना सादर करेल.

दुभाजकांची गुणवत्ता आणि सुरक्षितता

मध्य दुभाजकांची रेषा, पातळी, कारागिरी, सौंदर्यपूर्ण रूप आणि वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश आहेत. आराखड्यात काही बदल करायचे असल्यास ते वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय साधून तपासावेत, असेही सांगण्यात आले.

राडारोडा हटवण्यासाठी विशेष मोहीम

संचेती रुग्णालय ते बालेवाडी या महत्त्वाच्या मार्गावरील बांधकामाचा राडारोडा, अतिरिक्त साहित्य, अनावश्यक अडथळे आणि पदपथांवरील साहित्य हटवण्यासाठी महापालिका व टाटा प्रोजेक्ट्सने संयुक्त स्वच्छता मोहीम राबवावी. काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे अनावश्यक साहित्य, सुरक्षा बॅरिकेड्स व फलक एका आठवड्यात हटवण्याचे निर्देश देण्यात आले.

पदपथ, पादचारी सुविधा व चौकांची सुधारणा

बाणेर रस्त्यावरील पदपथ, चौक, पादचारी सुविधा, सायकल मार्ग आणि सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण ही कामे नागरी रस्ते रचना मार्गदर्शक तत्त्वांनुसार (USDG) नियोजित करावीत. यासाठी मनपाच्या नगररचना व नागरी रचना कक्षाचे सहकार्य घ्यावे. पुणे ग्रँड टूरपूर्वी पदपथ दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यक सुशोभीकरणाला प्राधान्य द्यावे.
वाहतूक पोलिसांनी निदर्शनास आणलेल्या पाच महत्त्वाच्या चौकांमध्ये व यू-टर्नच्या ठिकाणी आवश्यक सुधारणा ग्रँड टूरपूर्वी पूर्ण कराव्यात.

मेट्रो उड्डाणपुलांचे रंगकाम व प्रकाशव्यवस्था

पुणे ग्रँड टूर मार्गावरील मेट्रो उड्डाणपुलांचे रंगकाम महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत करावे आणि मेट्रो मार्गावर आवश्यक तात्पुरती प्रकाशव्यवस्था तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.

कृती आराखडा सादर करण्याचे आदेश

सर्व प्रलंबित कामांचा सविस्तर कृती आराखडा टाटा प्रोजेक्ट्सने संबंधित कार्यगटास व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करावा. या कामांच्या प्रगतीचा वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर नियमित आढावा घेतला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0