Pune Youth Congress | PMC आयुक्तांना धमकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक | महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ आंदोलन

पुणे युवक कॉंग्रेस कडून महापालिका गेटवर आंदोलन

HomeBreaking News

Pune Youth Congress | PMC आयुक्तांना धमकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक | महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ आंदोलन

Ganesh Kumar Mule Sep 30, 2026 8:24 PM

PMPML | Bonus | पीएमपीच्या कायम आणि बदली कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी | कर्मचारी संघटना आक्रमक
PMC Budget Dispute : हेमंत रासनेंच्या  अंदाजपत्रकावर आयुक्त घेणार राज्य सरकारचे मार्गदर्शन 
Ganesh Bidkar : गणेश बिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त : सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात विविध विकास कामांच्या कार्यक्रमांचे आयोजन 

Pune Youth Congress | PMC आयुक्तांना धमकीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक | महापालिका गेटवर ‘कुंभकर्ण’ आंदोलन

 

PMC Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आयुक्तांना ९० कोटींच्या निविदेप्रकरणी सत्ताधारी आमदाराने दिलेल्या धमकीच्या घटनेचा पुणे शहर युवक काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेवर निष्क्रीय राहिलेल्या आणि निद्रिस्त झालेल्या राज्य शासनाचा व स्थानिक प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कुंभकर्ण’ बनून झोपलेल्या ‘देवाभाऊ’ला उठवण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. (Naval Kishore Ram IAS)

हे आंदोलन पुणे शहर काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, आणि पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वातीताई शिंदे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी आंदोलकांनी पुणे महापालिकेच्या गेटसमोर झोपलेल्या ‘कुंभकर्ण’ रुपी देवाभाऊंच्या प्रतीकात्मक पुतळ्याभोवती ढोल-ताशे वाजवून व जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे व सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “प्रामाणिक अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे”, “ठेकेदारधार्जिणे सरकार हाय हाय”, अशा विविध घोषणांनी महापालिका परिसर दुमदुमून गेला होता.

मा. प्रशांतदादा जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्या आयएएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्यांना जर सत्ताधारी पक्षाचे आमदार ॲट्रॉसिटी आणि हक्कभंगाच्या धमक्या देत असतील, तर सामान्य जनतेचे काय? हे सरकार आणि गृहमंत्रालय झोपेचे सोंग घेत असून त्यांना जागे करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे.”

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सौरभ अमराळे यांनी इशारा देताना म्हटले की, “महापालिकेचा निधी वाचवून पारदर्शकपणे काम करणाऱ्या आयुक्तांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. आयुक्तांना धमकी देणाऱ्या त्या आमदाराचे नाव तातडीने जाहीर करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा युवक काँग्रेस संपूर्ण शहरात याहून तीव्र आंदोलन करेल.”

यावेळी नगरसेवक व पुणे शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष ( पूर्व ) प्रशांत दादा जगताप, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ दादा अमराळे, नगरसेवक मा सुनील शिंदे, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वातीताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव मेघश्याम धर्मावात, दिलीपसिंह देशमुख, पुणे शहर युवक काँग्रेस वकील सेल अध्यक्ष ऋषिकेश थोरात, पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सद्दाम शेख, अभिजीत चव्हाण, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष विक्रांत धौत्रे, शहर महासचिव सागर धावडे, स्वप्नील गायकवाड, यश कोलते, अक्षय नवगिरे, कार्तिक शिरहट्टी, असिफ सय्यद, अझर शेख, रेहान बाबुर्डे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: