PMC Security Guard | पुणे महापालिकेत नव्या 32 गावांसाठी 500 अतिरिक्त सुरक्षा रक्षक घेण्यास स्थायी समितीची मंजुरी

Homeadministrative

PMC Security Guard | पुणे महापालिकेत नव्या 32 गावांसाठी 500 अतिरिक्त सुरक्षा रक्षक घेण्यास स्थायी समितीची मंजुरी

Ganesh Kumar Mule Aug 17, 2026 9:33 PM

Koregaon-Bhima | पीएमपीएमएल कडून कोरेगाव-भिमा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी विशेष बससेवेचे नियोजन
Metro | Shivsena | पुणे मेट्रोचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करा | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ची मागणी
Kalicharan Baba | कालीचरण बाबाच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक!

PMC Security Guard | पुणे महापालिकेत नव्या 32 गावांसाठी 500 अतिरिक्त सुरक्षा रक्षक घेण्यास स्थायी समितीची मंजुरी

| प्रशासकीय इमारती, शाळा, उद्याने, स्मशानभूमींच्या सुरक्षेसाठी निर्णय

 

PMC Standing Comittee – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील महापालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षेसाठी 500 अतिरिक्त बहुउद्देशीय कामगार सुरक्षा रक्षक घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्रशासनाच्या मूळ प्रस्तावातील 350 ऐवजी उपसूचनेद्वारे 500 रक्षक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. (PMC Security Department)

स्थायी समितीत हा ठराव नुकताच मंजूर करण्यात आला.

पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने, जलकेंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभूमी, मंडई, शाळा, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, उद्याने, वस्तीगृह येथे सुरक्षेसाठी सध्या कंत्राटी पद्धतीने 1915 बहुउद्देशीय कामगार नेमण्यात आले आहेत. यासाठी मे.स्मार्ट सर्व्हिसेस, मे.सैनिक इंटिग्रेटेड आणि मे.क्रिस्टल इंटिग्रेटेड या तीन संस्थांना 3 वर्षांसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.

सुरक्षा विभागात 1992 पासून मंजूर असलेल्या 666 कायम पदांपैकी 411 पदे रिक्त आहेत. त्यामुळे तातडीची सुरक्षा व्यवस्था कंत्राटी रक्षकांमधून केली जात आहे.

नवीन 32 गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर तेथील स्मशानभूमी, शाळा, उद्याने, जलकेंद्रे, पाण्याच्या टाक्या, दवाखाने, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडासंकुले, मंडई, क्षेत्रीय कार्यालये यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक ठिकाणी चोरी, अनधिकृत प्रवेश आणि अतिक्रमणाच्या घटना घडल्या होत्या.

स्थळ पाहणीनंतर 178 ठिकाणांसाठी एकूण 557 सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने सुरुवातीला 350 अतिरिक्त रक्षकांचा प्रस्ताव मांडला होता.

स्थायी समितीने काय बदल केले?
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार परिमंडळ 1 साठी 199, परिमंडळ 2 साठी 81, परिमंडळ 3 साठी 166 आणि परिमंडळ 4 साठी 131 असे एकूण 557 रक्षकांची गरज होती. त्यापैकी टप्प्याटप्प्याने 350 रक्षक घेण्याची मागणी होती. मात्र स्थायी समितीने यावर उपसूचना मांडून संख्या 350 ऐवजी 500 करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता एकूण 1915 अधिक 500 म्हणजे 2415 कंत्राटी सुरक्षा रक्षक महापालिकेच्या मालमत्तेची सुरक्षा पाहतील.

चालू आर्थिक वर्षासाठी सुरक्षा विभागाकडे बहुउद्देशीय कामगारांच्या बिलांसाठी 70 कोटींची तरतूद आहे. मार्च 2027 पर्यंत 10 कोटी खर्च अपेक्षित असून उर्वरित 64 कोटी लागणार आहेत. नवीन 500 रक्षक घेतल्यास मार्च 2027 पर्यंत अतिरिक्त 12 कोटीं पेक्षा तरतूद लागेल.

या निर्णयामुळे नव्या 32 गावांमधील महापालिकेच्या मालमत्तांना आणि नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळणार आहे. तसेच शाळा, स्मशानभूमी आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण आणि तोडफोडीच्या घटना कमी होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: