Pune PMC News | स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना पारितोषिक | कसबा पेठ प्रथम, शिवाजीनगर-घोलेरोड द्वितीय

Homeadministrative

Pune PMC News | स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना पारितोषिक | कसबा पेठ प्रथम, शिवाजीनगर-घोलेरोड द्वितीय

Ganesh Kumar Mule Aug 11, 2026 7:39 AM

Pune City | पुणे आता शांत राहिले नाही | १० पैकी ९ नागरिक म्हणतात पुण्याचे पर्यावरण चांगले नाही!
Chandni Chowk pune | चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन
Sonia Gandhi Birthday | सोनीया गांधी वाढदिवसानिमित्त २ ते ९ डिसेंबर २०२४ सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उदघाटक

Pune PMC News | स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना पारितोषिक | कसबा पेठ प्रथम, शिवाजीनगर-घोलेरोड द्वितीय

 

Ajit Pawar Jayanti  – (The Karbhari News Service) – लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेने 22 जुलै ते 28 जुलै आणि 5 ऑगस्ट पर्यंत राबवलेल्या स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांना  पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. (PMC Solid Waste Management Department)

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी उप महापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, उपायुक्त संतोष वारुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केलेल्या मूल्यांकनानुसार प्रथम पारितोषिक कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाला 50 लाख रुपये,
द्वितीय पारितोषिक छ. शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाला 25 लाख रुपये आणि
तृतीय पारितोषिक नगररोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाला 15 लाख रुपये देण्यात आले.

तसेच वारजे-कर्वेनगर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाला विशेष कामगिरीबाबत उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

या स्वच्छता सप्ताहात 15 क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत एकूण 63 मे.टन ओला कचरा, 86.7 मे.टन सुका कचरा, 247.3 मे.टन राडारोडा, 4.5 मे.टन प्लास्टिक कचरा आणि 5.2 मे.टन अडगळीचे सामान संकलित करण्यात आले. 15726 नागरिकांनी यात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात सफाई सेवकांना PPE किटचे वाटपही करण्यात आले.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: