धम्मपुन्न सेंटर ला 30 वर्षे मुदतवाढ
: शहर सुधारणा समितीची मान्यता
: विपश्यना ध्यान वर्ग चालवले जातात
धम्मपुण्ण हे पुणे शहरातील मध्यवर्ती भागात विपश्यना या ध्यान वर्गासाठी पुणे महानगरपालिकेने संयुक्त प्रकल्पाद्वारे पर्वती शुक्रवार पेठ फा.प्लॉट नं. ५०० अ टी.पी.एस.|| येथे सुमारे ३ एकर जागा दिलेली आहे. या धम्मपुण्ण सेंटर मध्ये सामान्य नागरिक तसेच लहान मुले, सरकारी कर्मचारी, अंध-अपंग यांना विपश्यना या ध्यान साधनेबद्दल १० दिवस, १ दिवसा, ३ दिवस इ. कार्यकाळाचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. पुणे विपश्यना समिती यांनी धम्मपुण्ण हे विपश्यनेचे केंद्र स्थापन केल्यापासून सुमारे ७५,००० नागरिक, सरकारी कर्मचारी इ. यांनी मोफत लाभ घेतलेला आहे. सदर जागेमध्ये पुणे विपश्यना समितीने विपश्यना साधकांनी दिलेल्या दानामधून बांधकाम व इतर विकास केलेला आहे. पुणे विपश्यना समिती आणि एस.एन. गोएंका गुरूजी यांनी अविरत मेहनतीने सुरू केलेल्या विपश्यना ध्यान धारणेच्या तत्वाचा अवलंब करून पुणे मनपाच्या सहकार्याने गेली २० वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. पुणे मनपा व पुणे विपश्यना समिती यामधील संयुक्त प्रकल्पाच्या करारास सध्याच्या सुरू असलेल्या करार मुदत संपल्याच्या दिनांकापासून ३० वर्षे पुढे मुदतवाढ देणेस मुख्य सभेकडे शिफारस आहे. असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी दिला होता. याला शहर सुधारणा समितीने मंजूरी दिली आहे.
COMMENTS