Mohan Joshi Congress | विद्यार्थ्यांवर लाठीहल्लाबद्दल अमित शहांनी उतर द्यावे | अन्यथा पुणे भेटीला विरोध करू | माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा

HomeBreaking News

Mohan Joshi Congress | विद्यार्थ्यांवर लाठीहल्लाबद्दल अमित शहांनी उतर द्यावे | अन्यथा पुणे भेटीला विरोध करू | माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा

Ganesh Kumar Mule Jul 28, 2026 10:58 AM

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार
Amit Shah on Sharad Pawar | ५८ वर्षांत तुम्ही गरिबांसाठी काय केलं | अमित शाह यांचा काँग्रेस ला सवाल | शरद पवारांना दिली भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी उपमा
Amit Shah in Pune | प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा थोरले बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Mohan Joshi Congress | विद्यार्थ्यांवर लाठीहल्लाबद्दल अमित शहांनी उतर द्यावे | अन्यथा पुणे भेटीला विरोध करू | माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा

 

Pune News – (The Karbhari News Service) – दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला आणि प्लेनेट गनचा मारा याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे, अन्यथा शहा यांच्या पुणे भेटीला विरोध करू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (Home Minister Amit Shah)

लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा  १ऑगस्ट २०२६ रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी तीव्र निदर्शने करून त्यांच्या पुणे भेटीला विरोध नोंदविण्याचा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे. विद्यार्थ्यावर अमानुष लाठीहल्ला झाला, विद्यार्थी विद्यार्थिनी जायबंदी झाल्या. एक पत्रकारही प्लॅनेट गनने जखमी झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णाल्यात दाखल करावे लागले. प्लॅनेट गनच्या माऱ्यात विद्यार्थी जायबंदी झाले. यातील जखमी विद्यार्थी विद्यार्थिनींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांसमोर आणले. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्याबाबत नागरिकांमध्येही संताप आहे. देशातील शैक्षणिक पद्धत, स्पर्धा परीक्षा यात सुधारणा व्हाव्या याकरीता शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे संरक्षण करणे ही जबाबदारी केंद्र सरकारची होती. ती जबाबदारी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पार पाडली नाही. उलट दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठ्याकाठ्या चालविल्या, त्या कोणाच्या आदेशाने चालविल्या? त्याचे उत्तर गृहमंत्री या नात्याने अमित शहा यांनी द्यायलाच हवे. हे खाते केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे अमित शहा जबाबदारी झटकू शकत नाहीत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: