Pune PMC News  | पुणे महानगरपालिकेकडून शहरातील ४४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा गौरव

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेकडून शहरातील ४४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा गौरव

Ganesh Kumar Mule Jul 06, 2026 7:38 PM

Maharashtra Day in PMC | पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन साजरा!
PMC Pune Social DevlopmentDepartment | पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागात 149 कर्मचाऱ्यांचे समायोजन
PMPML’s bus services | ‘पीएमपीएमएल’ ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा | १३ लाख प्रवाशांनी केला पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर

PMC Sport Scholarship | पुणे महानगरपालिकेकडून शहरातील ४४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा गौरव

 

Pune PMC News : (The Karbhari News Service) – पुणे ही क्रीडा परंपरा आणि गुणवंत खेळाडूंची भूमी आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी आपल्या जिद्द, मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर पुण्याच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या यशातून नव्या पिढीतील खेळाडूंना प्रेरणा मिळून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची नवी ऊर्जा मिळेल. पुणे महानगरपालिका गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शहरात सक्षम क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले. (Pune Breaking News)

पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान सोहळा आज पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक हॉल येथे उत्साहात पार पडला. या सन्मान सोहळ्यात महापौर नागपुरे बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, क्रीडा समितीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांच्यासह उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, तसेच विविध मान्यवर, क्रीडापटू, प्रशिक्षक, अधिकारी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. पुणे महानगरपालिका राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून, सुधारित क्रीडा धोरणाच्या माध्यमातून गुणवंत खेळाडूंना आवश्यक सुविधा, प्रोत्साहन आणि सन्मान देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: