Pune Alternate Day Water Supply | पुण्यात सोमवारपासून पाणीकपात – एक दिवसाआड पाणीपुरवठा  

Homeadministrative

Pune Alternate Day Water Supply | पुण्यात सोमवारपासून पाणीकपात – एक दिवसाआड पाणीपुरवठा  

Ganesh Kumar Mule Jun 11, 2026 8:19 PM

PMC Employees | सफाई कामगारांच्या वारसांना कनिष्ठ अभियंता होण्याची संधी! | पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १५ दिवसात अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन 
Affidavit | Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती
Krida Bharati | जिजामा सन्मान पुरस्काराचे आयोजन

Pune Alternate Day Water Supply | पुण्यात सोमवारपासून पाणीकपात – 15 जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने सोमवार, 15 जून पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रिनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप उपस्थित होते. (Pune Water Supply)

खडकवासला धरण साखळीत केवळ 5.03 TMC पाणी शिल्लक असून त्यापैकी मनपासाठी 3.0 TMC पाणी उपलब्ध आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान 90% पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता 60% आहे. सध्याचा साठा 20 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच आहे.

कशी असेल पाणीपुरवठा योजना

झोननिहाय सम आणि विषम तारखेला पाणी दिले जाईल.
पाणीकपातीचे वेळापत्रक मनपाने तयार केले असून जबाबदारी संबंधित अभियंत्यांवर सोपवली आहे.

पाणी न आल्यास टँकरची व्यवस्था केली जाईल. टँकर चालकांनी गैरव्यवहार केल्यास गुन्हे दाखल होणार.

काय बंद, काय सावधगिरी
वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव, हॉटेल्सना पाणी कपात लागू.

बांधकाम, वाहन धुणे, अंगण-पदपथ धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद.

सार्वजनिक आणि खाजगी स्विमिंग पूल, उद्यानांसाठी पिण्याचे पाणी बंद.

नागरिकांनी पाणी साठवू नये, लिकेज आढळल्यास तात्काळ कळवावे.

सोसायट्यांनी STP कार्यान्वित ठेवून पाण्याचा पुनर्वापर करावा.

तांत्रिक अडचणींमुळे भामा आसखेड प्रकल्पातून पाणी घेणाऱ्या उत्तर-पूर्व भागाला सध्या पाणीकपातीतून सूट दिली आहे. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर 8 ते 11 जुलै दरम्यान संपूर्ण शहराला नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होईल.

तक्रारीसाठी नागरिक PMC Care हेल्पलाइन 1800-1030-222, व्हॉट्सअॅप 9689900002 किंवा PMC Care अॅपवर संपर्क साधू शकतात. अधिक माहिती http://www.pmc.gov.in वर उपलब्ध आहे.

 

अनावश्यक पाणी साठवू नका. पाणी जपून आणि कमी वापरा. गाडी धुण्यासाठी पाणी वापरू नका. शहरात लिकेज दिसून येईल  तेव्हा कळवा आम्ही दुरुस्ती करू.

मंजूषा नागपुरे, महापौर. 

—-

शहरातील पाणीकपातीचे वेळापत्रक आम्ही तयार केले आहे. सम आणि विषम तारखेस पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्याची जबाबदारी संबंधित अभियंता यांच्यावर सोपवली आहे. जिथे पाणी येणार नाही, तिथे टॅंकर ने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी या अभियंत्यांची आहे. पाणीकपात मुळे टँकर चालकानी गैरफायदा घेतला तर गुन्हे दाखल केले जातील.

गणेश बिडकर, सभागृह नेता.
——-

पहिला आठवडा अडचणीचा जाईल, पण 25% तरी पाण्याची बचत होईल. लवकरच आम्ही कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता आणि इतर विभागांची बैठक घेऊन अंमलबजावणीचा आढावा घेणार आहोत.

पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: