Pune PMC News | नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी येरवडा ताडीगुत्ता, चिमा गार्डन येथील झोपडपट्टीवर महापालिकेची कारवाई

Homeadministrative

Pune PMC News | नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी येरवडा ताडीगुत्ता, चिमा गार्डन येथील झोपडपट्टीवर महापालिकेची कारवाई

Ganesh Kumar Mule May 31, 2026 7:33 AM

Vidhan Parishad Election | पुणे विधानपरिषद निवडणूक २०२६: ७ उमेदवार रिंगणात | राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत ‘कलगीतुरा’
Pune Municipal Corporation Employees | पुणे महापालिकेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना कामकाजाचे प्रशिक्षण बंधनकारक 
Bhimashankar | राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

Pune PMC News | नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी येरवडा ताडीगुत्ता, चिमा गार्डन येथील झोपडपट्टीवर महापालिकेची कारवाई

५८ पात्र झोपडीधारकांचे खराडी-हडपसर येथे पुनर्वसन

 

Pune News – (The Karbhari News Service) –  नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी पुणे पेठ येरवडा येथील स. नं. १५२ मधील ताडीगुत्ता व चिमा गार्डन परिसरातील झोपडपट्टीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई केली. येथील ५८ पात्र झोपडीधारकांचे स. नं. १७, खराडी व शिंदे वस्ती, हडपसर येथे पुनर्वसन करण्यात आले, तर २९ अपात्र झोपडीधारकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. (PMC Encroachment Action)

अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

सदर कारवाई उप आयुक्त परिमंडळ क्र. १ च्या आशा राऊत, महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम, कनिष्ठ अभियंता अजय मोरे, फारूक पटेल तसेच अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त रमेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अतिक्रमण निरीक्षक व सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

यंत्रणा व मनुष्यबळ

कारवाईसाठी २ पोकलेन, ३ जेसीबी व १५ डम्पर, गॅस कटर यांसह ७० अतिक्रमण बिगारींचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नदीकाठच्या जागा मोकळ्या करून नदी पुनरुज्जीवन योजनेच्या कामाला गती देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

पुनर्वसन व कारवाईचे कारण

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, नदी पुनरुज्जीवन योजनेसाठी ताडीगुत्ता व चिमा गार्डन येथील झोपडपट्टी हटवणे आवश्यक होते. त्यानुसार पात्र ठरलेल्या ५८ झोपडीधारकांना हडपसर व खराडी येथे पर्यायी घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. उर्वरित २९ अपात्र झोपडीधारकांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

नदीकाठ अतिक्रमणमुक्त करून नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाला वेग देण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या भागातील पात्र नागरिकांचे पुनर्वसन झाल्याने आता प्रकल्पाच्या पुढील कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: