Prashant Jagtap on PMP | बस खरेदीच्या माध्यमातून पुणेकरांची लूट! | प्रशांत जगताप यांची उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका

HomeBreaking News

Prashant Jagtap on PMP | बस खरेदीच्या माध्यमातून पुणेकरांची लूट! | प्रशांत जगताप यांची उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका

Ganesh Kumar Mule Apr 30, 2026 8:06 PM

PPP Road | पीपीपी तत्त्वावरील 6 रस्त्यांच्या 162 कोटींच्या कामांना मंजूरी | मुंढवा परिसरातील 3 आणि महंमदवाडी भागातील 3 रस्ते
Palakhi Sohala 2026 – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महानगरपालिका सज्ज- महापौर मंजुषा नागपुरे
Man-Hinjewadi-Shivajinagar Metro Project | माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ प्रकल्पास अर्बन इन्फ्रा ग्रुपकडून  PPP मेट्रो प्रकल्प पुरस्कार 

Prashant Jagtap on PMP | बस खरेदीच्या माध्यमातून पुणेकरांची लूट! | प्रशांत जगताप यांची उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका

 

PMC Standing Committee  – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत काही समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी PMPML तुटीचा प्रस्ताव सादर केला. यावेळी स्थायी समितीचे सदस्य प्रशांत जगताप यांनी संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या बस खरेदीला विरोध केला. PMPML चे अध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप यांना दांडगा अनुभव आहे. या अनुभवाच्या बळावर त्यांनी या बस खरेदीबाबत अनेक आक्षेप नोंदवले. (Pune News)

पुणे शहरातील BRT मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच, भविष्यातही BRT मार्गाचे धोरण नाही. असे असताना BRT मार्गासाठी लागणाऱ्या, उजव्या बाजूला मोठे दरवाजे असलेल्या बसेसची खरेदी करण्याचा घाट PMPML संचालक मंडळाने घातला आहे. साध्या बसेसची किंमत या BRT मार्गावरील बसेस पेक्षा ६ लाखाने कमी आहे, शिवाय साध्या बसेसची आसन क्षमताही जास्त आहे. ही वस्तुस्थिती माहिती असतानाही दोन्ही बाजूला दरवाजे असणाऱ्या, आसन क्षमता कमी असणाऱ्या, ६ लाखांनी जास्त किंमत असणाऱ्या बसेसची खरेदी का ? हा सवाल प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला आहे.

आजच्या PMPML संचालक मंडळाच्या बैठकीचा वृत्तान्त पुढील २ दिवसात सादर होईल. त्यानंतर तातडीने उच्च न्यायालयात या बस खरेदीला आव्हान देणार असल्याची भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: