PMC Tender Policy | निविदेच्या दराबाबत नियमावली ठरवली जाणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Homeadministrative

PMC Tender Policy | निविदेच्या दराबाबत नियमावली ठरवली जाणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Ganesh Kumar Mule Feb 26, 2026 10:03 PM

अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे नोंदणी महानिरीक्षक यांचे आदेश
Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा 
Madhuri Misal on PMC Projects | शहराच्या वाढत्या गरजांना अनुसरून प्रकल्पांची गती वाढवा | राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश 

PMC Tender Policy | निविदेच्या दराबाबत नियमावली ठरवली जाणार | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासनाकडून शहरात विविध विकासकामे केली जातात. त्यासाठी निविदा प्रक्रिया लागू केली जाते. मात्र ठेकेदारांकडून संबंधित कामाच्या इस्टीमेट पेक्षा कधी खूप ज्यादा तर कधी खूप कमी दर दिले जातात. याचा विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे या दराबाबत धोरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

शहरात विविध विकासकामे केली जातात. प्रशासक काळात देखील खूप कामे केली गेली. मात्र निविदा दरावरून नेहमी वादाचे मुद्दे उपस्थित होत गेले. कारण ठेकेदारा कडून कधी निविदेचा दर विकास कामाच्या मूळ रकमेपेक्षा कधी ४० ते ४५ टक्के कमी असायचा. तर कधी हा दर १५ ते २० टक्के ज्यादा असायचा. यात महापालिकेचे नुकसान होत नसले तरी विकासकामावर मात्र परिणाम झालेला दिसतो. याबाबत स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत चर्चा झाली.

याबाबत अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले कि, आगामी काळात आम्ही असे खूप कमी अथवा खूप ज्यादा दराचे टेंडर मान्य करणार नाही. याबाबत आम्ही प्रशासनाला आदेश दिले कि याबाबत एक धोरण आणि नियमावली ठरवली जावी. त्यानंतरच टेंडर ला मान्यता दिली जाईल. दरम्यान हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. कारण यामुळे विकासकामाचा दर्जा टिकून राहणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: