Nandini Dhende | दोन दिवसात सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन – नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा पाणी पुरवठा विभागाला इशारा

HomeBreaking News

Nandini Dhende | दोन दिवसात सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन – नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा पाणी पुरवठा विभागाला इशारा

Ganesh Kumar Mule Feb 18, 2026 7:54 PM

PMC Ward 38 – Ambegaon Katraj | प्रभाग क्रमांक ३८ – आंबेगाव कात्रज | या प्रभागात ५ सदस्य असणार आहेत | प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घ्या सविस्तर
PMC Election Voting | मतदान केंद्र असलेल्या इमारतींमध्ये १४ आणि १५ जानेवारी ला सुट्टी जाहीर!
Swachhta Mission | वाघिरे महाविद्यालयाने राबवले स्वच्छता अभियान

Nandini Dhende | दोन दिवसात सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन – नगरसेविका नंदिनी धेंडे यांचा पाणी पुरवठा विभागाला इशारा

 

PMC Ward 2 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास दोन दिवसांत नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याकडे लेखी निवेदन सादर करत इशारा दिला. (Pune Water Issue)

नगरसेविका धेंडे यांनी निवेदनात नमूद केले की, पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील समता नगर (महाराष्ट्र हौसिंग बोर्ड), नागपूर चाळ, विद्यानगर, टिंगरेनगर, शांतिनगर, चव्हाण चाळ आदी भागांत मागील सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. पाणी वेळेवर न येणे, कमी दाबाने येणे तसेच वारंवार पुरवठा खंडित होणे या समस्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने मागील पंधरा दिवसांपासून परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेक भागांतील रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांसह कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: