Pune Property Tax Hike | प्रशासक राजा उदार झाला अन सर्वात जास्त मिळकत कर भरणाऱ्या पुणेकरांच्या हाती १० च्या ऐवजी ५% करवाढीचा भोपळा दिला!

Homeadministrative

Pune Property Tax Hike | प्रशासक राजा उदार झाला अन सर्वात जास्त मिळकत कर भरणाऱ्या पुणेकरांच्या हाती १० च्या ऐवजी ५% करवाढीचा भोपळा दिला!

Ganesh Kumar Mule Feb 12, 2026 7:12 PM

Pune News | अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे — राज्यमंत्री माधुरी मिसाळ
PMPML Ticket Price Hike | पीएमपीच्या सुधारित तिकीट दराची अंमलबजावणी १ जून पासून | पीएमपी प्रशासनाचा निर्णय 
Sachin Adekar Congress | आपली खासदारकी पणाला लावून खरे बोलल्या बद्दल मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन | सचिन आडेकर 

Pune Property Tax Hike | प्रशासक राजा उदार झाला अन सर्वात जास्त मिळकत कर भरणाऱ्या पुणेकरांच्या हाती १० च्या ऐवजी ५% करवाढीचा भोपळा दिला!

| सर्वपक्षीय नगरसेवक १८ च्या मुख्य सभेत काय निर्णय घेणार?

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेवर गेल्या ४ वर्षांपासून प्रशासक आहे. या प्रशासकांची शेवटची स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. यात प्रशासक यांनी करवाढ बाबत निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रशासनाने स्थायी समिती समोर मिळकत करात सरसकट १०% दरवाढ सुचवली होती. मात्र याला होत असलेला विरोध पाहून प्रशासनाने १०% च्या ऐवजी ५% करवाढ केली आहे. त्यामुळे प्रशासक राजा उदार झाला आणि पुणेकराच्या हाती करवाढीचा भोपळा दिला. अशी चर्चा आता केली जात आहे. कारण आधीच सर्वात जास्त मिळकत कर भरणाऱ्या पुणेकरांना पुन्हा करवाढ देणे हेच अयोग्य आहे. आता सर्वपक्षीय नगरसेवक १८ तारखेच्या मुख्य सभेत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (PMC General Body)

गेले कित्येक वर्ष करवाढ झाली नाही, असे कारण सांगत महापालिका प्रशासनाने मिळकत करात सरसकट १०% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. मात्र याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून विरोध झाला होता. शिवाय करवाढीचा निर्णय हा २० फेब्रुवारी पूर्वी मुख्य सभेत मान्य होणे आवश्यक असते.

त्यानुसार मागील शुक्रवारी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली होती. मात्र या बैठकीत प्रशासनाने आपलाच विषय मागे घेत १०% च्या ऐवजी ५% दरवाढ सुचवली. तसेच याला समितीत मान्यता देखील दिली.

सर्वसाधारण कर ३%, सफाई पट्टी ३%, जल लाभ कर १%, जल निस्सारण लाभ कर १% आणि पथ कर २% अशी १०% वाढ सुचवली होती. मात्र प्रत्यक्ष प्रस्ताव मेनी करताना ५ टक्के दरवाढ सुचवली. यात सर्वसाधारण कर ३% आणि पथ कर २% अशी ५% दरवाढ केली आहे. सोबतच पाणीपुरवठा विभागाने सुचवलेली दरवाढ देखील मागे घेतली आहे.

दरम्यान स्थायी समितीने हा विषय मंजूर केला असला तरी मुख्य सभेने हा विषय मान्य करेपर्यंत याचे धोरण करता येत नाही. त्यामुळे हा विषय आता नगरसेवकांच्या अखत्यारीत आला आहे. सर्वपक्षीय नगरसेवक पुणेकरांना दिलासा देणार कि करवाढ करणार हे आता १८ च्या सभेत निश्चित होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: