Bodybuilding Competetion | जिल्हास्तरीय सिंहगड श्री 2026 स्पर्धाचे निकाल जाहीर! 

Homeपुणे

Bodybuilding Competetion | जिल्हास्तरीय सिंहगड श्री 2026 स्पर्धाचे निकाल जाहीर! 

Ganesh Kumar Mule Feb 11, 2026 8:01 AM

Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते दि.२ डिसेंबर रोजी उदघाटन
PMPML 7th Pay Commission | सातवा वेतन आयोग फरकापोटी पीएमपीला ८४ कोटी देण्यास मंजुरी
Indrayani River Pollution | इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

Bodybuilding Competetion | जिल्हास्तरीय सिंहगड श्री 2026 स्पर्धाचे निकाल जाहीर

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हास्तरीय सिंहगड श्री 2026 ही स्पर्धा कृष्णाई रिसॉर्ट, डोणजे, पुणे या ठिकाणी पार पाडण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन सिंहगड रोड नायट्रो जिमचे ओनर मा विशाल शहा व अजय गोळे सेक्रेटरी बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे यांच्या संलग्नतेने केले होते. या स्पर्धेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रो टेशन, 80% किचन, न्युट्रिफ्रेश , मसल हॉलिक या न्यूट्रिशियन सप्लीमेंट कंपन्यांनकडून सर्व खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात सप्लीमेंट गिफ्ट देण्यात आले. अशी माहिती बॉडी बिल्डींग अँड फिटनेस असोसिएशन पुणेचे जनरल सेक्रेटरी अजय लक्ष्मण गोळे यनी दिली.

या प्रसंगी “पुणे जिल्ह्यातील सर्व खेळाडूंसाठी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात सप्लीमेंट व मोठी रोख पारितोषिके देऊन स्पर्धा घेण्यात येतील त्यासाठी खेळाडूंनी तयारीला लागा ” असे आव्हान नवनिर्वाचित संघटनेचे उपाध्यक्ष  विशाल शहा सर यांनी केले.

फिरोज शेख, विनोद कागडे व अनिकेत राजगुरु यांच्यातील अतितटीच्या झालेल्या सामन्यात सिंहगड श्री 2026 चा मानकरी एम्स फिटनेस जिमचा अनिकेत राजगुरू ठरला.
महिला वूमन फिजिक फिटनेस गटातून आर बाउन्स फिटनेसची शितल वाडेकर व महिला बॉडी बिल्डिंग मध्ये मायटी फिटनेस ची यशोदा भोर हिने किताब जिंकला.
या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी अक्षय गायकवाड, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा मानकरी विनोद कागडे व अपकमिंग बॉडी बिल्डरचा मानकरी अरबाज शेख ठरला.
पुणे जिल्ह्यातील 165 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. जिम मॅनेजर सागर मराठे यांच्या मार्गदर्शनाने कृष्णाई रिसॉर्ट यांनी स्पर्धेचे आयोजन खूप उच्च दर्जाचे व नियोजनबद्ध केले होते.

या प्रसंगी माननीय विशाल शहा सिंहगड रोड नायट्रो जिम, जनरल सेक्रेटरी मा श्री अजय गोळे, मा प्रसाद जायगुडे प्रोटेन न्यूट्रिशन, मा योगेश मोरे प्रोटीन शॉप, मा डॉ प्रशांत मदने मसल हॉलिक, शिवछत्रपती पुरस्कार पुरस्कृत मा मंदार चवरकर व शिवछत्रपती पुरस्कार पुरस्कृत मा सौ मिनाक्षी ठाकूर, मा प्रमोद नाईक, श्री राजेश वाईकर , स्वप्नील देसाई , रोहित शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये पंच म्हणून मंदार चवरकर, राजेश वाईकर, प्रमोद नाईक, युनुस काझी, संग्राम पवार, कौस्तुभ शेडगे, शरद तिवारी, उमेश मोहतकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

वूमन बॉडी बिल्डिंग
पहिला क्रमांक यशोदा भोर
दुसरा क्रमांक वेदांती मारणे
तिसरा क्रमांक प्रतिमा कांबळे
वूमन फिजिक फिटनेस
पहिला क्रमांक शितल वाडेकर
दुसरा क्रमांक स्नेहल ठाकूर
तिसरा क्रमांक यशोदा भोर,

55 किलो गट
1 निलेश गजमल, 2 मोहीन बेपारी, 3 लवकुश चव्हाण, 4 सोमनाथ पाल, 5 अक्षय तांदळे, 6 सुरज सरोज,

60 किलो गट
1 अर्जुन देडे, 2 अमोल यमदे, 3 मोहसीन शेख, 4 सैफ खान, 5 शुभम शिंदे 6 विकास राठोड

65 किलो गट
1 संदीप तिवडे 2 विनायक कलरीकंडी, 3 अमन सय्यद 4 अमोल गावडे 5 एम डी अन्सारी 6 शितल बाबर

70 किलो गट
1 शुभम नखाते, 2 अजय रक्ताटे, 3 अक्षय पाटील, 4 प्रतीक साळुंखे, 5 तन्मय महाजन, 6 अक्षय गायकवाड

75 किलो गट
1 अनिकेत राजगुरू 2 अरबाज शेख 3 आकाश दरडमल 4 मयूर कानसकर 5 अजित तावरे 6 प्रथमेश कुंभारकर 75

80 किलो गट
1 विनोद काकडे 2 मिलिंद खर्चाने 3 ओंकार नलावडे 4 उदय ननावरे 5 रोहित कोकरे 6 ओंकार गाडी

80 किलो वरील गट
1 फिरोज शेख, 2 अक्षय शिंदे, 3 गणेश केंगळ 4 शुभम भोईटे 5 संदेश ओझगीर 6 भरत चव्हाण

 

मेन्स फिजिक पहिला गट

1 प्रफुल्ल गायकवाड
2 अजित तावरे
3 जय नवघरे
4 अक्षय पाटील
5 प्रसाद सुतार
6 प्रफुल्ल रोकडे
मेन्स फिजिक दुसरा गट
1 स्वप्निल बच्चे
2 जय वाकुडे
3 अमर पडवळ
4 सोमेश सुतार
5 अथर्व कटारे
6 लखन चव्हाण

या स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण जाधव व संग्राम पवार यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: