PMC Zonal Medical Officer Promotion | पदोन्नती दिलेल्या परिमंडळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी नेमणुका! 

Homeadministrative

PMC Zonal Medical Officer Promotion | पदोन्नती दिलेल्या परिमंडळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी नेमणुका! 

Ganesh Kumar Mule Feb 04, 2026 8:38 PM

Sharad Pawar Vs Chandrakant Patil | दगड कुठे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न! | शरद पवारांचा खोचक टोला 
Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 
Pune Municipal Corporation | मार्च महिन्यात पुणे महापालिकेचे (PMC) 61 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

PMC Zonal Medical Officer Promotion | पदोन्नती दिलेल्या परिमंडळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी नेमणुका!

PMC Officers Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आरोग्य विभागाकडील ५ वैद्यकीय तथा निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. बढती समितीने नुकतीच ५ अधिकाऱ्यांची शिफारस केली होती. त्यानुसार महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभे समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला  मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी नेमणुका देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Health Department)

वैद्यकीय आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही पदोन्नती देताना क्षेत्रीय कार्यालयाकडील ८ वर्षाचा कामाचा अनुभव गृहीत धरला असून सेवा ज्येष्ठतेने पात्र करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

अशा देण्यात आल्या आहेत नेमणुका

१. रेखा गलांडे – परिमंडळ कार्यालय ४

२. अमित शहा – परिमंडळ कार्यालय ३

३. संतोष मुळे – परिमंडळ कार्यालय १

४. स्वाती खाटपे (केतकी घाटगे) – परिमंडळ कार्यालय ५

५. दिपक पखाले – परिमंडळ कार्यालय २

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: