PMC Election | अनामत रक्कम परत घेण्याचे महापालिकेचे आवाहन | ऑनलाईन प्रणाली द्वारे दिली जाणार रक्कम
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२६ एक खिडकी परवानगी कक्षामार्फत विविध परवानगी साठी उमेदवारांकडून अनामत रकमा स्विकारण्यात आलेल्या होत्या. त्या आता परत केल्या जाणार आहेत. ऑनलाईन प्रणाली द्वारे ही रक्कम परत केली जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (Pune Municipal corporation Election)
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी रोजी पार पडले. उमेदवारांनी प्रचारफेरी/सभा / मिरवणूक याद्वारे प्रचार केला आहे. प्रचारफेरी / सभा / मिरवणूक यासाठी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २०२६ चे नियमानुसार एक खिडकी परवानगी कक्षामार्फत विविध परवानग्या देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रथमच ऑनलाईन संगणक प्रणालीचा वापर करण्यात आला होता.
वरील पैकी काही परवानगी देतांना उमेदवारांकडून अनामत रक्कम स्विकारण्यात आली होती. अनामत रक्कम परत करण्याचे काम ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे होणार आहे. तरी प्रतिनिधींनी / उमेदवारांनी / पक्षांनी खालील दिलेल्या लिंकवर जाऊन अनामत रक्कम परत प्राप्त करून घेणेकरिता अर्ज करायचा आहे. अर्ज करणेकरीता खाली दिलेली लिंक ०२/०२/२०२६ ते ०२/०४/२०२६ अखेर पर्यंत उपलब्ध राहणार असून त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. असे प्रशासनाने म्हटले आहे.

COMMENTS