Pune Mayor Election | महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेचे विभागीय आयुक्त यांना पत्र | विभागीय आयुक्त ठरवणार निवडीची तारीख आणि पिठासीन अधिकारी

Homeadministrative

Pune Mayor Election | महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेचे विभागीय आयुक्त यांना पत्र | विभागीय आयुक्त ठरवणार निवडीची तारीख आणि पिठासीन अधिकारी

Ganesh Kumar Mule Jan 23, 2026 9:21 PM

MLA Sunil Tingre | PMC Pune | विश्रांतवाडी चौकातील बुध्द विहार स्थलांतरित करण्यास परवानगी | आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश
BBC | Congress | केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे
DHARA 2023 | पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना | महापालिका आयुक्त

Pune Mayor Election | महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेचे विभागीय आयुक्त यांना पत्र

| विभागीय आयुक्त ठरवणार निवडीची तारीख आणि पिठासीन अधिकारी

 

Pune Mayor, Dy Mayor – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणूक पार पडली आहे. तर भाजपने बाजी मारत ११९ नगरसेवक निवडून आणत एक हाती सत्ता मिळवली आहे. आता पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानुसार सुरुवातीला महापौर आणि उपमहापौर निवडले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तारीख, वेळ आणि पीठासीन अधिकारी यांना नियुक्त करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. अशी माहिती नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. (Pune PMC News)

महापालिका अधिनियम नुसार महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर पहिल्यांदा महापौर आणि उपमहापौर निवडले जातात. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेता तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष निवडले जातात. अधिनियमानुसार महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रिया विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि नगरसचिव यांनी विचार करून कार्यवाही करायची असते.

या नियमांचा आधार घेत महापालिका प्रशासनाने महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी तारीख, वेळ आणि ठरवण्यासाठी तसेच पिठासीन अधिकारी देण्यासाठी पत्र दिले आहे. यावर विभागीय आयुक्तांचे उत्तर पुढील आठवड्यात देण्याची शक्यता आहे. दरम्यान आगामी तीन दिवस आता सुट्टी असणार आहे.

दरम्यान पुण्याचे महापौर पद महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
—-

महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी तसेच त्याची तारीख, वेळ आणि पिठासीन अधिकारी ठरवण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्त यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यांचा प्रतिसाद आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.

योगिता भोसले, नगरसचिव.
—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: