PMC Employees Promotion |  लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती  | अर्ज करण्यासाठी १ महिन्याची मुदतवाढ 

Homeadministrative

PMC Employees Promotion |  लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती  | अर्ज करण्यासाठी १ महिन्याची मुदतवाढ 

Ganesh Kumar Mule Jan 07, 2026 8:39 PM

Tamhini Ghat Bus Accident | ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्तांसाठी देवदूतांसारखे धावून आले एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक !
Vijaystambh Abhiwadan | Perne Fata | विजयस्तंभ अभिवादन दिनी बार्टी उभारणार ३०० पुस्तक स्टाॕलचे दालन
Transfer | Rajendra muthe | उपायुक्त राजेंद्र मुठे यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बदली! | राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Employees Promotion |  लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती  | अर्ज करण्यासाठी १ महिन्याची मुदतवाढ

| ३ १ जानेवारी पर्यंत करू शकता अर्ज

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडील चतुर्थश्रेणी संवर्गातील सेवकांना लिपिक टंकलेखक वर्ग- ३ या पदावर पदोन्नतीने नेमणूका देण्यात येणार आहेत. चतुर्थश्रेणी संवर्गातील ज्या सेवकांची ३१ डिसेंबर २०२५  अखेर शेड्युलमान्य पदावर ५ वर्षे अखंडीत सेवा झाली आहे. तसेच शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या सेवकांनी आपला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह खातेप्रमुख यांचे शिफारशीने आस्थापना विभागकडे ३१ डिसेंबर अखेर सादर करावेत. असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र आता यासाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. कर्मचारी ३१ जानेवारी पर्यंत अर्ज करू शकतात. याबाबतचे परिपत्रक उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी जारी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक या पदाच्या सुधारित सेवाप्रवेश नियमास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे लिपिक टंकलेखक (२५%) पदोन्नती पदाची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे.

अ) मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
ब) राज्य शासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (जीसीसी) किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे शासकीय प्रमाणपत्र / संगणक टंकलेखनाचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
क) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C. C. C. किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर पैकी कोणतेही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक तसेच शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरविलेली संगणक अर्हता धारण करणे अनिवार्य राहील.
ड) मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक.
इ) पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणीतील पदावर किमान ५ वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या व वरील विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता व गुणवत्ता या आधारे पदोन्नतीने नियुक्ती.

प्रशासनाने म्हटले आहे कि, अपूर्ण अर्ज / कागदपत्रे व मुदतीनंतर अर्ज सादर केलेल्या सेवकांचा व सादर करतील त्यांचा ‘ लिपिक टंकलेखक’ या पदाच्या यादीमध्ये विचार केला जाणार नाही. सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४’ मधील नियम क्र. ५ ( ब ) चतुर्थ श्रेणी संवर्गातील जे कर्मचारी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असतील त्यांना लिपिक टंकलेखक या पदावर पदोन्नती मिळण्यासाठी केवळ प्रश्नपत्रिका १ ची परिक्षा द्यावी लागेल. या कर्मचाऱ्यांना ही परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ४० % गुण आवश्यक असतील. सर्व खातेप्रमुख यांनी या गोष्टी आपल्या विभागातील सर्व संबंधितांना अवगत कराव्यात. असे देखील म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: