PMC Security Department | राज्य सुरक्षा महामंडळ कडून महापालिका घेणार १०० सुरक्षा रक्षक | मुख्य सभेच्या मान्यतेनंतर देण्यात आले कार्यादेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या विविध संवेदनशील ठिकाणी बंदोबस्ताकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडुन १०० सुरक्षा रक्षक घेतले जाणार आहेत. १ वर्षासाठी हे सुरक्षा रक्षक घेतले जाणार आहेत. या बाबतच्या प्रस्तावाला मुख्य सभेने मान्यता दिल्यानंतर खात्याने कार्यादेश देखील दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
१ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे कडुन ०१ असिस्टंट सिक्युरिटी ऑफीसर (ASO), ०१ लेडीज सिक्युरिटी सुपरवायझर(LSS), ०५ असिस्टंट हेड गार्ड (AHG), ११ आर्म सिक्युरिटी गार्ड( ASG ), ८२ सिक्युरिटी गार्ड (पुरुष व महिला) (SG/LSG ) असे एकूण १०० सुरक्षा जवान उपलब्ध करून घेतले जाणार आहेत.
यासाठी १ कोटी १४ लाख ६३ हजार इतका खर्च येणार आहे.
निर्धारित व नियुक्त केलेल्या ठिकाणच्या आवश्यकतेनुसार बदलाचा व सुरक्षा रक्षकांच्या बदलीबाबतचे अधिकार सुरक्षा अधिकारी यांचेकडे असेल. सुरक्षा रक्षकांच्या रजा कालावधी दरम्यान पर्यायी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे, हजेरी जमा करणे, दर महाची बिले विहित वेळेत सादर करणेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळची राहणार आहे.

COMMENTS