PMC Security Department | सुरक्षा विभागाला वाढीव ३५० सुरक्षा रक्षक | खर्च वाढला नसला तरी निविदेचा कालावधी मात्र केला कमी! 

Homeadministrative

PMC Security Department | सुरक्षा विभागाला वाढीव ३५० सुरक्षा रक्षक | खर्च वाढला नसला तरी निविदेचा कालावधी मात्र केला कमी! 

Ganesh Kumar Mule Dec 20, 2025 2:23 PM

Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Water Uses | महापालिकेच्या ज्यादा पाणी वापरामुळे पाणीटंचाई! | जलसंपदा विभागाने राज्य सरकारकडे केली महापालिकेची तक्रार
Aadhaar Card |  देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती | निष्काळजीपणा केला तर पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही

PMC Security Department | सुरक्षा विभागाला वाढीव ३५० सुरक्षा रक्षक | खर्च वाढला नसला तरी निविदेचा कालावधी मात्र केला कमी!

 

 

PMC Security Guard – (The Karbhari News Service) -पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाने नुकतेच १५६५ बहुउद्देशीय कामगार घेतले आहेत. जवळपास १४० कोटींचे ही निविदा होती. ३ कंपन्यांना १ सप्टेंबर पासून याचे काम देखील सोपवण्यात आले आहे. दरम्यान यात अजून ३५० कामगारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खर्च जरी वाढला नसला तरी निविदेचा कालावधी मात्र कमी करण्यात आला आहे. कालावधी हा ३६ महिन्यावरून २५ महिने इतका कमी करण्यात आला आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मुख्य सभेने मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामार्फत क्षेत्रिय कार्यालये आरोग्य केंद्रे, (दवाखाने) जलकेंद्रे, सांस्कृतीक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभुमी, मंडई, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी शुध्दीकरण केंद्र इत्यादी ठिकाणी सुरक्षा विषयक कामासाठी सुरक्षा रक्षकाना मदतनीस बहुउद्देशीय कामगार पुरविणेकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.   ठेकेदाराने दिलेल्या दरानुसार १५६५ कामगार संख्यापैकी  स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. यांना (९००)  सैनिक इंटिग्रेटेड अॅन्ड सिक्युरिटी प्रा. लि. यांना (५००) व  क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड यांना (१६५), या कामगार संख्येनुसार विभागुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निविदाधारकांना ३६ महीनेकरीता १५६५ बहुउद्देशीय कामगारासाठी एकुण १३९ कोटी ९२ लाख ११ हजार -रक्कमे पर्यंत काम करून घेणेकरीता कार्यादेश देवुन १ सप्टेंबर २०२५ पासुन काम सोपविण्यात आलेले आहे.

प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे कि, सुरक्षा विभागाकडील सुरक्षा रक्षकांची संख्या अत्यंत कमी असल्याने पुणे मनपाच्या अनेक मिळकती, वास्तु. उदयाने, दवाखाना, पाणी टाक्या, जलकेंद्रे, स्मशानभुमी, सांस्कृतिक केंद्रे, मनपा प्राथमिक शाळा तसेच नव्याने समाविष्ट गावातील मिळकतीवरील सुरक्षा व्यवस्था उघडी पडली आहे. म्हणून विविध खात्याने वाढीव बहुउद्देशीय कामगारांची वारंवार मागणी केली होती त्यास अनुषंगाने ५०० बहुउद्देशीय कामगार वाढवुन मिळणेबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांचेकडे सादर करण्यात आलेला होता.  आयुक्त यांनी सदर प्रस्तावावर मूळ निविदेतील १५६५ बहुउद्देशीय कामगाराचे संख्येला अनुसरून ३५० नवीन बहुउददेशीय कामगार नियुक्त करणेस मान्यता दिलेली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षा कंपन्यांना त्याच निकषाप्रमाणे वाढीव ३५० बहुउद्देशीय कामगारांचे वाटप केले जाणार आहे.  स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. यांना (९००+२१०=१११०), सैनिक इंटिग्रेटेड ॲन्ड सिक्युरिटी प्रा. लि. यांना (५००+१०५=६०५) व  क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड यांना (१६५+३५= २००) असे एकुण १९१५ बहुउद्देशीय कामगारांचे काम विभागुन देण्यात आले  आहे. या  वाढीव मान्यतेमुळे मुळ निविदा रकमेत वाढ न करता निविदेचा कालावधी ३६ महीने ऐवजी २५ महीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुळ निविदा प्रस्तावातील रकमेत कोणताही बदल न करता केवळ निविदेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. दरम्यान कामाची मुदत १/०९/२०२५ ते ३०/०९/२०२७ अशी राहील. असे प्रस्तावात म्हटले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: